शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जिल्हा परिषद नान्नज शाळेतील गुणवंतांचा सत्कार जि. प. प्रा. शा. नान्नज मुले,मुली व उर्दु शाळेत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

0
170

जामखेड न्युज——

शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जिल्हा परिषद नान्नज शाळेतील गुणवंतांचा सत्कार

जि. प. प्रा. शा. नान्नज मुले,मुली व उर्दु शाळेत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

दिनांक २८ जानेवारी २०२५ वार मंगळवार रोजी जि प प्रा शा नान्नज मुले, मुली व उर्दु येथे शाळा व्य.समिती नान्नज मुले आयोजित कार्यक्रमात शाळेतील व नान्नज केंद्रातील विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष नान्नज चे सरपंच मा.महेंद्र मोहळकर हे होते.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संकल्प महिला ग्रामसंघ प्रमुख मा.मनिषाताई मोहळकर यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आरपीआय जिल्हाध्यक्ष मा.सूनीलभाऊ साळवे, जामखेड काँग्रेस तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले,नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख रामराव निकम ,चेअरमन अप्पासाहेब मोहळकर,चेअरमन इन्नुस पठाण, ज्येष्ठ पत्रकार लियाकत शेख, ग्रा.पं.सदस्य दत्तात्रय मोहळकर, ग्रा.पं.सदस्य अतुल मलंगनेर , बोराटे ताई नान्नज मुले शाळेचे शा.व्य.समिती अध्यक्ष मजहर पठाण,नान्नज उर्दु शाळा व्य. समिती अध्यक्ष सद्दाम पठाण,नान्नज मुले शाळा व्य.समिती उपाध्यक्ष अंगद हजारे,आसिफ पठाण,बँकसखी शुभांगीताई वाघमारे,कृषीसखी दर्शनाताई साळवे, बोराटेताई हे उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना नान्नज केंदस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये जि प प्रा शा नान्नज मुले शाळेतील खालील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

वेशभूषा सादरीकरण – किलबिल गट :-कार्तिक सतिश मोहळकर ( इ २ री ) तृतीय क्रमांक, वेशभूषा सादरीकरण – बालगट: युवराज महेंद्र मोहळकर (इ ४ थी) :द्वितीय क्रमांक, वैयक्तिक गीतगायन बालगट :स्वराज नंदकुमार मोहळकर (इ 4 थी) :- द्वितीय क्रमांक, वक्तृत्व स्पर्धा बालगट – स्वराज बाळासाहेब मलंगनेर (इ 4 थी) :-द्वितीय क्रमांक, हस्ताक्षर स्पर्धा किलबिल गट :- अन्वित तुषार दळवी ( इ 1 ली )- द्वितीय क्रमांक, हस्ताक्षर स्पर्धा बालगट :- सार्थक रविसिंग रजपुत (4 थी) :- तृतीय क्रमांक
जामखेड येथे संपन्न झालेल्या तालुकास्तर विविध गुणदर्शन स्पर्धे मध्ये गोष्ट कथा सादरीकरण – विशाल मनोज हजारे (इ ४ थी) या विद्यार्थ्यांस द्वितीय क्रमांक व तालुकास्तर सांस्कृतिक स्पर्धेत इयत्ता 4 थी च्या नाटिकेस (गड आला पण सिंह गेला) द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल तसेच नान्नज केंद्रातील जि.प.नान्नज मुली, नान्नज ऊर्दू, गुरेवाडी व दत्तवाडी शाळेमधील तालुकास्तर व जिल्हास्तऱीय गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

त्याचबरोबर जि.प.शाळा नान्नज मुले अंतर्गत शाळास्तरावर ‘चला सामान्य ज्ञान वाढवूया’ या उपक्रम अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘सामान्य ज्ञान चाचणी’ मधील गुणवंत विद्यार्थी,आनंददायी शनिवार अंतर्गत झालेल्या पाढे पाठांतर,संगीत खुर्ची,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा मधील विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र,स्केच पेन बॉक्स देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

शिक्षणप्रेमी युवकांकडून शालेय साहित्य वाटप
नान्नज मधील धनंजय दत्तू मेहर, सागर अरुण मोहळकर, बाजीराव गोपीनाथ मोहळकर व बिपीन गोपाळ मोहळकर या शिक्षण प्रेमी तरुणांनी समाजाचे दायित्व जपत जि प प्रा शा नान्नज मुले, मुली व उर्दु शाळेतील सर्व २६० विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक २०० पेजेस रजिस्टर व एक पेन या शालेय साहित्याचे वाटप केले. तसेच प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यांना स्केचपेन पाकीट चे वाटप करण्यात आले,त्यांच्या या कार्याबद्दल सर्वांनी विशेष कौतुक करून आभार मानले आहे.
आदर्श शिक्षक बाळासाहेब जरांडे यांचा सन्मान
जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडून देण्यात येणारा सन २०२४-२५ या वर्षासाठीचा आदर्श शिक्षक पुरस्कार नान्नज केंद्रातील जि.प.शाळा पवारवस्ती शाळेचे चे मुख्याध्यापक बाळासाहेब जरांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुस्तक,देऊन सन्मान करण्यात आला.
जि.प.प्रा.शाळा मोहळकरवस्ती शाळेचा सन्मान ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ अभियान मध्ये जि.प.प्रा.शाळा मोहळकरवस्ती शाळा नान्नज केंद्रात प्रथम क्रमांक आल्यामुळे मुख्याध्यापिका भिमा बोरुडे यांचा सन्मान करण्यात आला.

संकल्प महिला ग्रामसंघ नान्नज यांचे कडून शाळेस ४०००० रुपये देणगी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नान्नज मुले आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ,महिला मेळावा,हळदी कुंकू कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेल्या मनिषाताई मोहळकर यांनी संकल्प महिला ग्राम संघाच्या माध्यमातून शाळेसाठी चाळीस हजार एक रुपयाची देणगी दिली.त्यांच्या या दातृत्वाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.

महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमास उल्लेखनीय प्रतिसाद
महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमासाठी नान्नज गावातील माता भगिनींनी उदंड प्रतिसाद देत जवळपास १२० महिलांनी उपस्थिती दर्शवली.यावेळी हळदी कुंकू कार्यक्रमानंतर महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले.त्यात उपस्थित महिलांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेत,चुरशीने व आनंददायी वातावरणात खेळाच्या स्पर्धा पार पडल्या.
त्यामध्ये संगीत खुर्ची,तळ्यात मळ्यात,लिंबू चमचा इ.खेळ घेऊन त्यातून प्रत्येकी तीन विजेते निवडून त्यांना स्टील डबा बक्षीस म्हणून देण्यात आला.नान्नज गावामध्ये या उपक्रमाचे उपस्थित ग्रामस्थ व महिलांमधून कौतुक करण्यात येत होते.
शाळा व्यवस्थापन समितीचा ग्रामस्थ व शाळेतर्फे सत्कार
या विविधरंगी व प्रेरणादायी कार्यक्रमाबद्दल उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व शाळेतर्फे शाळा व्य.समितीचे अध्यक्ष मजहर पठाण, उपाध्यक्ष अंगद हजारे व सर्व सदस्य गणेश पवार,सौ.पुजा रजपुत,सौ.शितल भुजबळ,सतिश साळवे,रामदास मोहळकर,रामदास गाजरे,संतोष मोहळकर,डॉ.गणेश राऊत,प्रभाकर किंबहुने, ब्रह्मदेव मोहळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ अनारसे व प्रास्ताविक मनोजकुमार कांबळे यांनी केले. महिला मेळावा कार्यक्रम व विविध स्पर्धेचे सूत्रसंचालन व नियोजन जयश्री दळवी, शिवाली डुचे, स्वाती सरवदे, आशा सोनवणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन विकास बगाडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी बाबासाहेब कुमटकर, किरण माने, शेख मॅडम यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here