चोंडी पुण्यनगरीत शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत
जामखेड च्या समस्या बाबत निवेदन
जामखेड तालुक्यातील चोंडी पुण्यनगरीत शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जामखेड शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले तसेच जामखेड परिसरातील काही अडीअडचणी विषयी त्यांना निवेदन देण्यात आले. अडीअडचणी तातडीने सोडविल्या जातील असे शिंदे साहेबांनी सांगितले.
पुण्यनगरी चोंडी येथे शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले व शिक्षकांच्या काही प्रलंबित मागण्या विषयी निवेदन देण्यात आले त्यात लक्ष घालून सोडविल्या जातील असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
आकाश बाफना यांनी जामखेड शहरातील विविध प्रलंबित समस्यांबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन सादर केले. शहरातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित अडचणींचा यामध्ये समावेश होता. या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन त्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी करण्यात आली.उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही या निवेदनाची दखल घेत संबंधितअधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
याचबरोबर एस टी कर्मचारी यांच्या काही नियमबाह्य झालेल्या बदल्या तसेच सर्व पात्रता पुर्ण असतानाही नोकरीत डावलले गेलेल्या उमेद्वारावराला न्याय देण्यात यावा म्हणून निवेदनाद्वारे मागणी केली असता सर्व प्रश्नांची खात्री करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे आयोजित ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडी आणि गोदावरीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर येथून झाला.
जलपूजन आणि कलश यात्रा महाराष्ट्रातील प्रमुख ३० नद्यांचे जलकलश एकत्रित करून, ते त्र्यंबकेश्वरहून मार्गस्थ होतील कुकडी-घोड खोऱ्यातील पवित्र जल कलशामधून येडगाव धरणावर पूजन करून महेश्वरकडे रवाना करण्यात येणार आहे.
अहिल्यादेवी होळकरांच्या जलसंवर्धनाच्या आणि जलव्यवस्थापनाच्या वारशाचे स्मरण करणे, तसेच “पाणी वाचवा, जीवन वाचवा” या संदेशाद्वारे जनजागृती करणे हा प्रमुख उद्देश आहे.
यावेळी तालुकाप्रमुख कैलास माने, शहर प्रमुख मोहनजी देवकाते, ज्येष्ठ नेते कैलास जाधव, उपजिल्हा प्रमुख तात्या वाळुंजकर, जिल्हा ओबीसी अध्यक्ष शिवकुमार डोंगरे, जामखेड तालुका शिवसैनिक मोठ्या संख्येनेउपस्थित होते.