Home ताज्या बातम्या सभापती प्रा. राम शिंदे यांनी काही मित्रांना वाचविण्यासाठी जामखेड करांना वेठीस धरले...

सभापती प्रा. राम शिंदे यांनी काही मित्रांना वाचविण्यासाठी जामखेड करांना वेठीस धरले – आमदार रोहित पवार समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ मार्ग आणि NEET पेपरफुटीवरही रोहित पवारांचे गंभीर आरोप

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

सभापती प्रा. राम शिंदे यांनी काही मित्रांना वाचविण्यासाठी जामखेड करांना वेठीस धरले – आमदार रोहित पवार

समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ मार्ग आणि NEET पेपरफुटीवरही रोहित पवारांचे गंभीर आरोप

गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले आहे. जामखेड वगळता इतर ठिकाणचे अतिक्रमणे निघतात जामखेड मधील अतिक्रमण निघत नाहीत कारण काही अतिक्रमण धारक सभापती प्रा राम शिंदे यांचे मित्र आहेत. मित्रांना वाचविण्यासाठी त्यांनी जामखेडकरांना वेठीस धरले आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

आज जामखेड शहरातील बस स्थानक, ग्रामीण रुग्णालय यासह विविध कामांची पाहणी आमदार रोहित पवार यांनी केली यावेळी ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी, अमोल राळेभात, रमेश आजबे, विजयसिंह गोलेकर, वंचित बहुजन आघाडीचे अँड अरूण जाधव, कैलास वराट, सागर कोल्हे, काका राळेभात, राजेश गोरे, इस्माईल सय्यद, नगरसेवक वसीम सय्यद व वसीम शेख,प्रविण उगले, गणेश उगले, युवराज उगले, विश्वनाथ राऊत,अँड मयुर डोके, शाकीर सय्यद, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत सुतार यांच्या सह अनेक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

विविध विकास कामांची पाहणी करून शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्ते अडीअडचणी समजवून घेण्यासाठी आले असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सभापती महोदय मुंबई, इंदोर येथील अतिक्रमणे काढण्यासाठी पुढाकार घेतात पण जामखेड मध्ये मात्र त्यांच्या काही मित्रांसाठी जनतेला वेठीस धरले आहे. अधिकाऱ्यांना सांगितले जाते की, मी सांगितल्या शिवाय काहीही काम सुरू करायचे नाही असे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी त्यांच्या पदाचा वापर जामखेड करांच्या विकासासाठी करावयास हवा आहे. मित्रांच्या विकासासाठी नको.. 

समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ मार्ग आणि NEET पेपरफुटीवर रोहित पवारांचे गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी समृद्धी महामार्ग, प्रस्तावित शक्तीपीठ मार्ग आणि NEET पेपरफुटी प्रकरणावर गंभीर आरोप करत राज्यातील भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे.

रोहित पवार यांनी आरोप केला की, समृद्धी महामार्ग जाहीर होण्याच्या दोन वर्षांपूर्वीच काही अधिकारी, नेते आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी दरात जमिनी खरेदी केल्या. रस्ता निश्चित झाल्यानंतर त्याच जमिनी मोठ्या किमतीत पुन्हा विकल्या गेल्या. यामध्ये शेतकऱ्यांना फायदा न होता मधल्या दलालांनीच कोट्यवधींचा लाभ घेतला.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आता प्रस्तावित शक्तीपीठ मार्गावरही तसाच प्रकार सुरू आहे. नाशिकमधील अशोक खरात यांनी सोलापूर परिसरात शक्तीपीठ मार्गालगत जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांनी केला. दोन लाखांत घेतलेली जमीन पुढे कोट्यवधींना जाईल, या अपेक्षेने व्यवहार झाल्याचे त्यांनी म्हटले.

रस्ता नेमका कुठून जाणार, याची माहिती काही मोजक्या लोकांनाच आधी कशी मिळते? शासनाशी संबंधित लोकांनाच ही माहिती कशी मिळते? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. हा संपूर्ण प्रकार भ्रष्टाचाराचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, NEET परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणावरही रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सामान्य कुटुंबातील विद्यार्थी वर्षभर मेहनत करून, परवडत नसतानाही महागडे क्लासेस लावून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र पेपरफुटीसारख्या प्रकारांमुळे त्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचे त्यांनी म्हटले.

2024 च्या NEET परीक्षेत 280 पैकी तब्बल 180 प्रश्न गेस पेपरमधून आल्याचा दावा करत त्यांनी पेपरफुटीचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. “पेपर रद्द झाला असेल, पण यामागे जबाबदार कोण? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

जमीन घोटाळा असो किंवा पेपरफुटी… दोन्ही ठिकाणी सामान्य माणूसच भरडला जात असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

चौकट
भाजपा नेत्यांच्या गाड्या पाण्यावर चालतात का? आमदार रोहित पवार
देशात पेट्रोल डिझेल महाग होत चालले आहे. याचे कारण सरकारला इराणबरोबर चे चांगले संबंध टिकवता आले नाहीत यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. पंतप्रधान सांगतात अनावश्यक गाड्या फिरवू नका मात्र भाजपाचेच नेते वीस वीस गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात. आणि भाजीसाठी पण तेलाऐवजी पाण्याची फोडणी घालतात का? आम्हाला सांगे ज्ञान व आपण कोरडे पाषाण अशी गत आहे. तसेच सोने खरेदी करू नका यामुळे अनेक कारागिरांची उपासमार होणार आहे.

चौकट
कचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटातून कोण फायदा घेत आहे, हेही लोकांसमोर यायला हवे, असे त्यांनी म्हटले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!