देशातील सर्वात मोठे मानवी रचनेतील “२६ जानेवारी” नाव रयतच्या नागेश संकुलात होणार साकार मानवी रचनेत विद्यार्थी फडकवणार २२५ फूट तिरंगा.

0
766

जामखेड न्युज——

देशातील सर्वात मोठे मानवी रचनेतील “२६ जानेवारी” नाव रयतच्या नागेश संकुलात होणार साकार

मानवी रचनेत विद्यार्थी फडकवणार २२५ फूट तिरंगा.

७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिना निमीत्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश संकुलात
नागेश विद्यालय,ज्युनिअर कॉलेज व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार रोहित (दादा) पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होणार आहे . मानवी रचनेतील “२६ जानेवारी” भव्य नावाचे उद्घाटन आमदार रोहित दादा पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे.

प्राचार्य मडके बी के यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य मानवी रचनेतील “२६ जानेवारी ” हे नाव साकारण्यात येणार आहे. कलाशिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी हे साकारणार आहेत. या मानवी चित्राची लांबी २२० व रुंदी १९० फूट असून क्षेत्रफळ ४१८०० स्क्वेअर फुट आहे . या मानवी रचनेतील चित्रात भव्य २२५ फूट तिरंगा विद्यार्थ्यांनी हातात धरून फडकवनार आहे.

“२६ जानेवारी” मधील विद्यार्थ्यांच्या हातात छोटे राष्ट्रध्वज देण्यात येणार आहे. श्री नागेश व कन्या विद्यालय मधील २३०० विद्यार्थी विद्यार्थिनी व १७ महा बटालियन एनसीसीचे नागेश विद्यालयाचे एनसीसी कॅडेट, नागेश व कन्या विद्यालय सर्व शिक्षक सहभागी आहेत.

तसेच १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे श्री नागेश विद्यालय युनिट उत्कृष्ट संचलन सादर करून मानवंदना देऊन. विविध देशभक्तीचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. तरी सर्वांनी २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७.३० वा उपस्थित रहावे असे आवाहन अशी विनंती प्राचार्य मडके बी के यांनी केले.

हे मानवी रचनेतील नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड साठी पात्र आहे. “२६ जानेवारी”हे देशातील सर्वात मोठे नाव म्हणून नोंद होणार आहे. २६ जानेवारी २०२५
रोजी सकाळी ७.३० वा उपस्थित रहावे .
ड्रोन व्ह्यू पाहायला मिळेल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here