जामखेड न्युज——-
कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान – न्यायाधीश व्ही व्ही जोशी
बालिका दिनानिमित्त कायदे विषयक जनजागृती शिबीर नागेश विद्यालय उत्साहात संपन्न.
मुलींनी शिक्षण घेणे आवश्यक आहे मुलगी दोन्ही घरांना पुढे घेऊन जाते. शाळेमध्ये मुलींच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्यात.
मुलींना कोणी छेडछाड पाठलाग किंवा त्रास देत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाते. मुलींनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे. गुन्हा घडत असेल तर आवाज उठवला पाहिजे सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान आहेत. न्यायाधीश व्ही व्ही जोशी यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले.
तालुका विधी सेवा समिती, वकील संघ जामखेड व रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय ज्यूनियर कॉलेज व कन्या विद्यालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने बालिका दिना निमित्त बेटी बचाव बेटी पढाओ, बाल सेवा विधी व त्याचे संरक्षण योजना २०२४, पोक्सो कायदा या विषयी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन नागेश विद्यालयात करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ मासाहेब ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील व यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी, प्रमुख उपस्थिती न्यायाधीश श्रीमती ए बी फ़ंड, अँड जी आर डोके मॅडम, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड. प्रमोद राऊत,अँड नागरगोजे , अँड कात्रजकार पी के, अँड हर्षल डोके, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापक संजय हजारे, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के. एनसीसी ऑफिसर मयुर भोसले, अँड बाळासाहेब घोडेस्वार, अँड विटकर, गुरुकुल प्रमुख संतोष ससाजाते प्रा विनोद सासवडकर, प्रा कैलास वायकर, सौ साळुंके मॅडम, सौ शिंदे मॅडम, श्री. राजेश जाधव सर , श्री. सागर ढगे सर , साळुंके बी एस, संभाजी इंगळे,रघुनाथ मोहळकर, बडे सर,पोकळे सर, नागेश विद्यालय, कन्या विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक, शिक्षिका स्टाफ , एनसीसी कॅडेट उपस्थित होते.
एडवोकेट नागरगोजे यांनी मुलींनी शिक्षण घेत असताना शासकीय योजनांचा फायदा घ्यावा तसेच बालविधी सेवा कायदा 2024 याची माहिती दिली.
श्रीमती डोके मॅडम बेटी बचाव बेटी पढाव मध्ये सर्वांनी योगदान द्यावे तसेच अन्याय होत असेल 1098 हेल्पलाइन नंबर वापर करून तात्काळ मदत मिळवा अशी माहिती दिली.