प्रवाशांच्या खिशाला कात्री; एसटी बसचा प्रवास महागला
राज्यभरातील प्रवाशांसाठी एक सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेससह खासगी वाहनांचा प्रवास महागणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून प्रलंबित असलेल्या एसटी प्रवासाच्या भाडेवाडीला मंजूरी देण्यात आली आहे. एसटीच्या तिकीटात 14.95 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
संचित तोटा ९ हजारांवर आलेल्या एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी १५ टक्के तिकिटात वाढ (भाडेवाढ) करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता .
या प्रस्तावावर , गुरुवार २३ जानेवारी रोजी मंत्रालयात राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. भाडेवाढीवर शिक्कामोर्तब झाल्याने शनिवारी (दि. २५) पासून एसटीची भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. भाडेवाढ झाल्यानंतर राज्यातील जनतेचा एसटीचा प्रवास ६० ते ८० रुपयांनी महागणार आहे. (ST Bus Fare Hike)
एसटी महामंडळ राज्यभरात दररोज सुमारे १ ४ हजार बसच्या माध्यमातून ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करते.त्यातून महामंडळाला दिवसाला अंदाजे २३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु महामंडळाचे महिन्याला मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांचे गणित काही बसत नाही.त्यामुळे महामंडळाला दिवसाला सुमारे तीन ते साडे तीन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.
त्यामुळे महामंडळाने भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला. महामंडळाने राज्य सरकारला १४.१३ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिला होता. यापूर्वी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी महामंडळाची १७.१७ टक्के भाडेवाढ झाली होती. (ST Bus Fare Hike)
राज्यातील प्रमुख मार्ग (अंदाजित तिकिट दर) मार्ग सध्याचे तिकिट भाडेवाढीनंतर संभाव्य तिकिट दर