साकतचे सरपंच हनुमंत पाटील यांचे ब्रेन हॅमरेजने निधन

0
6563

जामखेड न्युज——

साकतचे सरपंच हनुमंत पाटील यांचे ब्रेन हॅमरेजने निधन

 

 

साकतचे सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जामखेड तालुकाउपाध्यक्ष हनुमंत पाटील वय ४८ याचे ब्रेन हॅमरेजने आज बुधवार दि. १५ रोजी सायंकाळी ८.४५ वाजता निधन झाले आहे यामुळे साकत जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे. उद्या गुरूवारी सकाळी नऊ वाजता साकत येथे मुरूमकर वैकुंठभुमी येथे अंत्यविधी होईल.

हनुमंत पाटील यांना सोमवार दि. १३ रोजी सायंकाळी अकरा वाजता अचानक त्रास होऊ लागल्याने ताबडतोब जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले वाटेत घाटाजवळ त्यांना जास्त त्रास झाला जामखेड वरून नगर व नगरहून पुणे येथील हाँस्पीटल मध्ये दाखल केले. आज निधन झाले. 

मंगळवारी आमदार रोहित पवार यांनी स्वत हाँस्पीटल मध्ये जाऊन डाॅक्टरांना भेटून मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात यावी असे सांगितले होते पण रक्तस्राव जास्त होत असल्याने शस्त्रक्रिया करता आली नाही.  आज सायंकाळी 8.45 वाजता प्राणज्योत मालवली.

हनुमंत पाटील यांनी स्वकर्तृत्वावर राजकारण व समाजकारणात एक वेगळा ठसा उमटवला होता साकतचे २०१० ते १५ पर्यंत ते सरपंच होते तसेच आता त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांची भावजयी सरपंच आहेत. तसेच आमदार रोहित पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाउपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले भाऊ, भाऊजय पुतण्या असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here