जामखेडचे ग्रामीण रुग्णालय जागे अभावी समस्याच्या गर्तेत ग्रामीण आरोग्य असून अडचण नसून खोळंबा – संजय कोठारी मानवी आरोग्याची सेवा एक दिवसही अशा वास्तुत देऊ शकत नाही डॉ. मोराळे

0
240

जामखेड न्युज——

जामखेडचे ग्रामीण रुग्णालय जागे अभावी समस्याच्या गर्तेत

ग्रामीण आरोग्य असून अडचण नसून खोळंबा – संजय कोठारी

मानवी आरोग्याची सेवा एक दिवसही अशा वास्तुत देऊ शकत नाही डॉ. मोराळे

 

जामखेड पंचायत समितीच्या जुन्या इमारतीत
सरकारी दवाखाना व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अवघ्या सहा खोल्यात चालू असून तेथे दररोज साडेतीनशेच्या आसपास रूग्णावर प्राथमिक उपचार केले जात आहे. आवश्यक स्टाफ आहे पण पुरेशा जागेअभावी उपचार केले जात नाहीत. त्यामुळे इमर्जन्सी रूग्ण व अपघात झालेल्या रूग्णावर खाजगी दवाखाना अगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल जावे लागते. नवीन आलेल्या एचएमपीव्ही व्हायरस रोगाचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने दोन्ही दवाखाने असून अडचण नसून खोळंबा आहे. एक प्रकारे आरोग्याची आणीबाणी आहे.

जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जागेत तीन वर्षांपासून भव्य अशा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे काम आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नाने चालू आहे. त्यामुळे येथील सरकारी दवाखाना वर्षभरापासून जामखेड पंचायत समितीच्या जुन्या इमारतीत सहा खोल्यात चालू आहे व त्याच ठिकाणी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना दोन खोल्यात चालू आहे. सध्याचे बदलते वातावरण पाहता दररोज साडेतीनशे ते चारशेच्या आसपास रूग्णावर येथे प्राथमिक उपचार केले जातात. यासाठी नेहमीचे लागणारे औषधे व इंजेक्शनं रूग्णाला मोफत दिली जातात. परंतु रूग्णाला अँडमिट करून उपचार करण्याची सुविधा नाही.

शासकीय रूग्णालयात एक क्लासवन अधिकारी, तीन क्लास टु अधिकारी, क्लास थ्री १२ व क्लास फोर पाच व इतर सात असा २८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुरेसा स्टाफ आहे. सदर दवाखान्याची इमारत खूपच जुनी असल्याने व तिचे आँडीट नसल्यामुळे आरोग्य कर्मचारी व रूग्णाला जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. जामखेड शहरात रस्त्याच्या अर्धवट कामामुळे धुळीचे साम्राज्य आहे. तसेच तापमानात होणारे बदल यामुळे रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु जागेअभावी रूग्णावर तात्पुरते उपचार केले जात आहे.
सर्दी खोकला व श्वसनाचे विकार सतत चालू आहेत. परंतु त्यासाठी प्रयोगशाळा नसल्याने रूग्णाला कोणता आजार होतोय त्याचे निदान होत नाही. ग्रामीण रुग्णालयाच्या जागेत चारमजली उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे काम चालू असून ते प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यासाठी वर्षदिडवर्ष लागणार तोपर्यंत रूग्णाची हेळसांड चालूच राहणार आहे. व सर्वसामान्य जनतेला महागड्या दवाखान्यात उपचारासाठी जावे लागणार आहे. तसेच जामखेड नगरपरिषदेची नवीन तयार असलेली इमारत फर्निचर व इतर सुविधा उपलब्ध नसल्याने धुळ खात पडून आहे. सदर इमारत ग्रामीण रुग्णालयासाठी दिली तर रुग्णावर उपचार होतील व रुग्णाचा खाजगी दवाखान्यात होणारा खर्च वाचेल तसेच कोरोना सारखा नवीन आलेला एचएमपीव्ही व्हायरसवर प्रतिबंध करण्यासाठी बेड उपलब्ध होतील. यासाठी दोन्ही लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी दखल घेण्याची गरज आहे.

चौकट
मानवी आरोग्याची सेवा एक दिवसही अशा वास्तुत देऊ शकत नाही डॉ. मोराळे
ग्रामीण रुग्णालयाच्या जागेत उपजिल्हा रुग्णालय इमारत चालू आहे. त्यामुळे वर्षभरापासून पंचायत समितीच्या जुन्या जागेत दवाखाना चालू आहे. सदर इमारतीचे स्ट्रक्चर आँडीट, फायर व इलेक्ट्रिक आँडीट नाही. तसेच नवीन आलेल्या एचएमपीव्ही व्हायरस रोग बाबत अद्याप मार्गदर्शन आले नाही. मानवी आरोग्याची सेवा एक दिवस ही अशा वास्तुत देऊ शकत नाही. अशी तक्रार मीच जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हाधिकारी यांचेकडे पत्राद्वारे केली आहे. नवीन इमारत होईपर्यंत नूतन नगरपरिषद पडून आहे ती मिळाल्यास रूग्णांना अँडमिट करून उपचार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. अशी प्रतिक्रिया दैनिक सामनाशी बोलताना वैद्यकीय अधिक्षक डॉ रामदास मोराळे यांनी व्यक्त केली.

 

चौकट
ग्रामीण आरोग्य असून अडचण नसून खोळंबा – संजय कोठारी
अपघातग्रस्त रुग्णांना जेव्हा मी ग्रामीण आरोग्य रुग्णालयात घेऊन जातो तेव्हा तेथे केवळ रुग्णांची मलमपट्टी करून गरीब रुग्णांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयाकडे वर्ग केले जाते. तसेच शवविच्छेदन गृहाकडे असलेली घाण, अस्वच्छता, दुर्गंधी त्या कडे वैद्यकीय अधिकारी लक्ष देताना दिसत नाहीत. तसेच डॉक्टर व कर्मचारी केवळ ड्युटी करायची म्हणून करतात यात सेवा कुठे दिसत नाही त्यामुळे हे ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशी अडचण आहे. अशी खंत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here