जामखेड येथे राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न, पहा कोणत्या गटात कोण विजयी

0
590

जामखेड न्युज——

जामखेड येथे राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न,

पहा कोणत्या गटात कोण विजयी

मल्ल विद्या संस्कार कुस्ती फौडेशन तर्फे उपमहाराष्ट्र केसरी पै बबन काका काशिद यांच्या वतीने जामखेड मध्ये आज दि. १२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत दहा वर्षांच्या बालका पासून ते ऐंशी वर्षाच्या आजोबापर्यंत सुमारे ५५० स्पर्धक धावले.

यावेळी पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात आयोजक बबन (काका) काशिद तर प्रमुख पाहुणे म्हणून आशियाई सुवर्ण पदक विजेते पै. सुजय तनपुरे, भाजपा तालुकाध्यक्ष
अजय काशिद, डॉ. कल्याण काशिद, उद्योजक आकाश बाफना, प्रफुल्ल सोळंकी, देविचंद डोंगरे, कॅप्टन लक्ष्मण भोरे, अँड हर्षल डोके, डॉ. पांडुरंग सानप, अमित जाधव, प्रा. आप्पा शिरसाठ, शोभा कांबळे, शिंदे सर, सुदर्शन चव्हाण, विठ्ठल देवकाते,
गफ्फार पठाण, मयुर भोसले, विजय काशिद, सुग्रीव ठाकरे, रमेश बोलभट, किशोर सातपुते
यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आकाश बाफना म्हणाले की, बबन काशिद यांनी पाच वर्षापूर्वी सुरू केलेल्या
स्पर्धेत सातत्य आहे. युवा पिढी घडविणे यासाठी ही स्पर्धा आवश्यक आहे.

यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, जामखेड तालुक्यातील युवकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी पै. सुजय तनपुरे याचा सत्कार करण्यात आला आहे. सुजय हा जामखेड चे भुषण होणार आहे.
यावेळी सुमारे ५५० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. दहा वर्षांच्या बालका पासून ते ऐंशी वर्षाच्या आजोबा पर्यंत अनेकांनी सहभाग नोंदवला.

राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन 2025 निकाल
मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन आयोजित भव्य राज्यस्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धा 2025
निकाल
21 किमी पुरुष खुलागट
प्रथम – अंकुश हाके (सांगली) बक्षीस 21000 रु वेळ 1 तास 6 मी.,
द्वितीय – ओंकार आव्हाड ( आष्टी)11000रु वेळ 1 तास 15 मी.,
तृतीय – संमेक राजगुरू ( पाथर्डी ) 7000 रु. वेळ 1 तास 24 मी,
चौथा – दीपक पवार (पाथर्डी) 5000 रु वेळ 1 तास 30 मी
पाचवा- सुजित पाटील ( सांगली) 3000रु वेळ 1 तास 35 मी.
11 किमी खुला गट महिला
प्रथम – प्रिया गुळवे (पारनेर ) 11000 रु,
द्वितीय – आरती बाबर (सातारा )7000रु
तृतीय – सुरेखा मातने ( पुणे) 5000 रु
चौथा – अंजली काळेल( सातारा)3000रु
पाचवा- अश्विनी हिरडे ( अ नगर ) 2000रु
5 किमी सोळा वर्षाच्या खालील मुले
प्रथम – ओंकार भुसनर ( सांगली) 5000 रु,
द्वितीय – सुरज खोत ( सांगली )3000रु
तृतीय – ओंकार राठोड ( धाराशिव) 2000 रु
5 किमी सोळा वर्षाच्या खालील मुली
प्रथम – वैभवी खेडकर ( अहिल्यानगर ) 5000
द्वितीय – समृद्धी जाधव ( पारनेर)3000रु
तृतीय – प्रणिता हीकरे (अहिल्यानगर) 2000

वरिष्ठ गट 50 वर्षांपुढील पुरुष 4 किमी
प्रथम – डॉ पांडुरंग सानप (जामखेड ) 5000 रु, द्वितीय – बबन नाईक ( जामखेड )3000रु
तृतीय – आप्पा शिरसाठ ( जामखेड ) 2000 रु

बाल गट 10 वर्षा खालील 2 किमी
प्रथम – आयुष जाधव (पारनेर ) 3000 रु, द्वितीय – सार्थक वीर ( जामखेड )2000रु
तृतीय – मयुरी मुळे ( सारोळा ) 1000 रु
वरिष्ठ गट महिला 4 किमी
प्रथम – झरकर मनीषा (जामखेड)
द्वितीय – शोभा कांबळे ( जामखेड )
तृतीय – भाग्यशी कोळी (जामखेड)
विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र ,मेडल सन्मान चिन्ह, रोख रक्कम चेक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
जामखेड येथील शिक्षक, पोलीस, व्यावसायिक यांनी 21 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा पुर्ण केली यामध्ये तात्यासाहेब जरे, बाळासाहेब औटी, प्रकाश जाधव, लक्ष्मण फाळके, जालिंदर यादव यांनी स्पर्धा यशस्वी पुर्ण केली.

चौकट

आज 21 किमी पुरुष खुलागट प्रथम क्रमांक पटकावलेला सांगलीचा अंकुश हाके याची वर्ल्ड चॅम्पियन मॅरेथॉन स्पर्धेसाठी साठी निवड झालेली आहे. ही अभिमानाची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here