विद्याभारतीच्या 50 विद्यार्थ्यांचे अबँकस परीक्षेत घवघवीत यश टाँपर अवार्ड व ग्रँड टाँपर अवार्ड मिळवले क्लासच्या विद्यार्थ्यांनी

0
52

जामखेड न्युज——

विद्याभारतीच्या 50 विद्यार्थ्यांचे अबँकस परीक्षेत घवघवीत यश

टाँपर अवार्ड व ग्रँड टाँपर अवार्ड मिळवले क्लासच्या विद्यार्थ्यांनी

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरातील माऊलीराजे लाँन्स मंगलकार्यालयात नुकत्याच झालेल्या सातव्या नॅशनल लेव्हल मेट्रोब्रेन अबँकस परीक्षेत विद्याभारती क्लासच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

सातवी नॅशनल लेव्हल मेट्रोब्रेन अबँकस परीक्षा मोहोळ येथे 5 जानेवारी 2024 संपन्न झाली यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. विजय पाटकर, मा. ओम जाधव, डायरेक्टर संतोष लोहारे सर लातूर हे होते.

या स्पर्धेत विद्याभारती अबँकस क्लासचे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये टाँपर अवार्ड कृष्णा नानासाहेब माळी याने मिळवला तर Grand Topper award आयान जावेद शेख याने मिळवला.

तसेच z लेव्हल मध्ये आनंदी शामसिंग परदेशी, ओम गौतम सानप

A लेव्हल मध्ये मध्ये अकुंर आनंद जाधव, स्वरा शिवाजी हजारे, प्रणव प्रवीण होळकर,अनम अंजुम शेख

B लेव्हल मध्ये कृष्णा नानासाहेब माळी व श्रवण किरण जाधव

अशा प्रकारे विद्याभारती अबँकस क्लासच्या
नऊ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तर बाकी उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना अँचिव्हर ट्राँफी मिळाली आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. यामध्ये टाँपर अवार्ड कृष्णा नानासाहेब माळी याने मिळवला तर Grand Topper award आयान जावेद शेख याने मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांना विद्याभारती अबँकस क्लासमध्ये जाधव मॅडम मार्गदर्शन करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here