आंतरमहाविद्यालयीन राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महिला संघाला रौप्यपदक, तसेच पिरॅमिड प्रकारात कांस्यपदक जामखेडच्या श्री शंभुसूर्य मल्लखांब संस्थेच्या स्नेहल भोसलेच्या उत्कृष्ट खेळाने संघाचा विजय खेलो इंडिया राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड
आंतरमहाविद्यालयीन राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महिला संघाला रौप्यपदक, तसेच पिरॅमिड प्रकारात कांस्यपदक
जामखेडच्या श्री शंभुसूर्य मल्लखांब संस्थेच्या स्नेहल भोसलेच्या उत्कृष्ट खेळाने संघाचा विजय, खेलो इंडिया राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड
रविवार दि. ५ जानेवारी २०२५ ते बुधवार दि. ८ जानेवारी २०२५ दरम्यान एल एन सी टी विश्व विद्यालय द्वारा आयोजित,भोपाळ येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महिला संघाला रौप्यपदक, तसेच पिरॅमिड प्रकारात कांस्यपदक मिळाले आहे. या विजयात जामखेडच्या श्री शंभुसूर्य मल्लखांब प्रशिक्षण संस्थेच्या स्नेहल भोसलेच्या उत्कृष्ट खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले व संघाचा विजय सुकर झाला.
या स्पर्धेत देशभरातून जवळपास ७० हून अधिक विद्यापीठांच्या, ६०० हून अधिक मुला-मुलींनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत श्री.शंभुसूर्य मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड,जिल्हा अहील्यानगर येथील मल्लखांब खेळाडू तसेच जामखेड महाविद्यालय जामखेडची विद्यार्थिनी कु. स्नेहल दत्तात्रय भोसले हिने आपल्या बहारदार प्रदर्शनाने उपस्थितांचे मने जिंकुन संघाच्या विजयास हातभार लावला.
या स्पर्धेत झालेल्या विजयामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तिला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच मुख्य प्रशिक्षक श्री बबलु (वस्ताद) टेकाळे, जामखेड महाविद्यालय जामखेडचे क्रीडा प्रशिक्षक प्रा.श्री.आण्णा मोहिते,मार्गदर्शक गुरुवर्य प्रशिक्षक श्री होनाजी गोडळकर, प्रशिक्षक श्री निलेश कुलकर्णी, प्रशिक्षक श्री अमित जिनसीवाले, प्रशिक्षक गणेश माने, प्रशिक्षक रोनित खुपसे, यांचे मार्गदर्शन लाभले.
तर संस्थेचे उपाध्यक्ष श्री राजुदादा भांबे, सचिव अमोलदादा निमोणकर, तसेच अहिल्यानगर जिल्हा व जामखेड तालुका मल्लखांब असोसिएशनच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या