विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला विज्ञान प्रदर्शनातून प्रोत्साहन मिळते – गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे मोहा येथे ४९ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन

0
560

जामखेड न्युज——

विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला विज्ञान प्रदर्शनातून प्रोत्साहन मिळते – गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे

मोहा येथे ४९ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण होऊन त्यांच्यामध्ये संशोधकवृत्ती निर्माण झाली पाहिजे. विज्ञान प्रदर्शनांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक घडतील. त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला विज्ञान प्रदर्शनातून प्रोत्साहन मिळेल. तसेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असे का? असे कसे असे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. तसेच पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून हरित मंदिरे तयार व्हावीत असे गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांनी सांगितले. 

जामखेड तालुकास्तरावरील गणित, विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनाच्या ४९ व्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून व्यक्त केले. प्रदिपकुमार महादेव बांगर व श्री देविचंद वामनराव डोंगरे उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे आज गुरूवार दि. ९ रोजी उद्घाटन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सभापती व जिजामाता हायस्कूल चे मुख्याध्यापक संजय वराट, श्री साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता काळे, भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देविचंद डोंगरे, सचिव ज्ञानदेव बांगर खजिनदार महादेव बांगर, संचालक विश्वनाथ गायकवाड, निवारा बालगृहाचे अँड डॉ. अरूण जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, केंद्रप्रमुख नवनाथ बडे, सुरेश मोहिते, केशव गायकवाड, विक्रम बडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक आप्पा शिरसाठ, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रविण गायकवाड, विज्ञान संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी बबन राठोड, गणित संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब इथापे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेपासून लांब राहून विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले, तसेच विज्ञान शिक्षकांनी विज्ञानाबाबत जनजागृती करून अंधश्रद्धामुक्त भारत घडविण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना निवारा बालगृहाचे अँड डॉ अरुण जाधव म्हणाले की, विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांची मोठी जबाबदारी असते. ही जबादारी शिक्षकांनी प्रमाणिकपणे पार पाडल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल घडू शकते असे सांगितले.

यावेळी बोलताना माजी सभापती व मुख्याध्यापक संजय वराट म्हणाले की, विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. ज्ञानाबरोबर विज्ञान आवश्यक आहे विज्ञानाचा सुयोग्य वापर करून प्रदुषण मुक्त शेती करणे आवश्यक आहे. यशस्वी नियोजनाबद्दल मोहा विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व स्टाफचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागरगोजे सर यांनी तर आभार बाजीराव गर्जे यांनी मानले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here