सभापती प्रा. राम शिंदे यांचा हात मोडलेले बँनर दोन दिवसांपासून उभेच
भाजपा पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
जामखेड शहरातील खर्डा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व भाजपामध्ये मोठे रणकंदन होऊन रोहित पवार यांचा फोटो हटवून सभापती प्रा राम शिंदे यांचे दि. २८ डिसेंबर रोजी भव्य दिव्य ३२ फुटाचे बँनर लावले होते. दि. २९ रोजी जामखेड शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी जोरदार वाऱ्यामुळे बँनर चा एक हात मोडलेले बँनर दोन दिवसांपासून तसेच उभे आहे. या गोष्टी कडे भाजपा पदाधिकारी यांचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
जामखेड शहरातील खर्डा चौकात आ. रोहीत पवार यांचे २५ फुट उंचीचे कट आऊट काढण्यावरून दि.२८ डिसेंबर शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप कार्यकर्ते समोरासमोर आले. तीन तास चाललेल्या या गोंधळामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती अखेर तीन तासानंतर प्रशासनाने आ. रोहीत पवार यांचा कटआऊट काढण्याचा आदेश दिला होता त्याजागी सभापती प्रा राम शिंदे यांचे भव्य दिव्य बँनर लावले होते. शहरातील भर चौकात सभापती असणाऱ्या नेत्याचे बँनर हात मोडल्यामुळे विद्रुपीकरण झाले आहे तरीही भाजपा पदाधिकारी यांचे या गोष्टी कडे दुर्लक्ष होत आहे.
आज याच ठिकाणी भाजपा सदस्य नोंदणी अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सर्व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते तरीही हे बँनर काढण्यात आले नाही याबद्दल शहरात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
जामखेड तालुक्याला प्रथमच एवढे मोठे संवैधानिक पद मिळाले आहे. भाजपा कार्यकर्ते खुश आहेत. याच आनंदाच्या उत्साहात भव्य दिव्य ३२ फुटाचे कटआऊट बँनर लावले होते. यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भाजपा कार्यकर्ते यांचीच आहे. आपल्या नेत्यांच्या बँनर चे विद्रुपीकरण होणार नाही हे पाहणे आवश्यक आहे.
या बँनरची काळजी घेण्याचे काम भाजपा पदाधिकारी यांचे आहे पण दोन दिवसांपासून हात मोडलेले बँनर तसेच उभे आहे जाणारे येणारे लोक याविषयी एकच चर्चा करत आहेत. लवकरात लवकर हे बँनर काढून दुरूस्ती करावे अशी मागणी जामखेड न्युजशी बोलताना एका निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांने नाव न छापण्याच्या अटीवर केली आहे.