जामखेड न्युज——
नांदेड येते झालेल्या सिनियर राज्यस्तरीय वुशु स्पर्धेमध्ये कोमल डोकडे, सुरेश राऊत ला सुवर्ण तर मोहिणी शिरगिरेला रौप्य पदक
स्पोर्ट्स काँम्प्लेक्स, यशवंत महाविद्यालय नांदेड येथे 22 व्या महाराष्ट्र राज्य सिनियर महिला पुरुष वुशू अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी जामखेड जि. अहिल्यानगर येथील कोमल डोकडे, सुरेश राऊत ला सुवर्णपदक तर मोहिणी शिरगिरेला रौप्य पदक मिळाले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोमल डोकडे, सुरेश राऊत व मोहिनी शिरगिरे हे खेळाडू नवीन मराठी शाळा,जामखेड येथे वुशु जिल्हा संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष व प्रशिक्षक शाम पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वुशु खेळाचा सराव करत आहेत.
सर्व खेळाडूंचे, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर साहेब,राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कर्जत-जामखेड चे आमदार रोहित दादा पवार, मा.जि.प.सदस्य प्रा.मधुकर राळेभात, उमेश देशमुख श्रीकांत होशिंग, प्राचार्य, क्रीडा शिक्षक बबलू टेकाळे, प्रल्हाद साळुंके, धीरज पाटील, राघवेंद्र धनलगडे, शाम पंडित,आबा जायगुडे, रोहित थोरात, विशाल धोत्रे, कृष्णा वनवे यांच्यासह अनेकांनी हार्दिक अभिनंदन केले व वुशुच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पोर्ट्स काँम्प्लेक्स, यशवंत महाविद्यालय नांदेड येथे 22 व्या महाराष्ट्र राज्य सिनियर महिला पुरुष वुशू अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत अहिल्यानगर वुशू संघाला तीन नंबर ची ट्राँफी मिळाली आहे.