दुकानाच्या बाहेर दुचाकी लावुन कापड दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या फीर्यादी यांची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांने चोरुन नेली होती. मात्र जामखेड पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा तपास करीत अवघ्या दोनच दिवसात चोरीस गेलेली मोटारसायकल सापडून दिली. याप्रकरणी दुचाकीसह आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी प्रकाश श्रीरंग राळेभात, वय 31 राहणार, कोल्हे वस्ती हे दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी बीड रोडवरील एका कापड दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या कडील मोटार सायकल क्रमांक एम MH 16 CM 4819 ही दुचाकी कापड दुकानाच्या समोर लावलेली होती.
यावेळी एका अज्ञात चोरट्याने नजर चुकवून ही दुचाकी चोरून नेली होती.फिर्यादी हे दुकानाच्या बाहेर आल्यानंतर आपली मोटरसायकल चोरीस गेली हे लक्षात आल्यावर त्यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्यादी व अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर जामखेड पोलीसांनी कापड दुकानातील सिसिटिव्ही फुटेज तपासले, तसेच तपास केले असता त्यांना एक संशयित आरोपी हा कर्जत येथील बाजारात असल्याचे माहीत झाले. यानंतर 6 जानेवारी रोजी सायंकाळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून आरोपीच्या मागावर लावत त्यास ताब्यात घेतले. यानंतर त्याने कर्जत तालुक्यातील बेलवडी ,राशीन रोडच्या एका धाब्याच्या पाठीमागे चोरुन आणलेली मोटारसायकल पोलिसांना दाखवली.
जामखेड पोलीसांनी अरोपी कडील मुद्देमाल हस्तगत करून अरोपी प्रकाश आजिनाथ गायकवाड वय 55 वर्षे, रा. बेनवडी. ता. कर्जत, यास ताब्यात घेऊन जामखेड पोलीस स्टेशन येथे आणले. यावेळी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण इंगळे, जे.ए. सरोदे, आर. एन. वाघ, प्रकाश मांडगे या पथकाने ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण इंगळे हे करीत आहे.