पत्रकाराच्या लेखणीत समाज घडविण्याची ताकद – पोलीस निरीक्षक महेश पाटील
पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकारितेमध्ये निर्भीड आणि वास्तववादी लेखणीत समाज घडविण्याची ताकद असते त्यामुळे पत्रकारांनी समाजहिताचे भान ठेऊन सकारात्मक पत्रकारिता करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.
६ जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त जामखेड येथे पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिन आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत होते. यावेळी पत्रकार वसंत सानप, अशोक निमोणकर, दिपक देवमाने, सुदाम वराट, संतराम सुळ, प्रकाश खंडागळे, अविनाश बोधले, अशोक वीर, पप्पूभाई सय्यद, फारूक शेख, अजय अवसरे, लियाकत शेख, किरण रेडे, संजय वारभोग, नंदुसिंग परदेशी, संतोष थोरात, अनिल धोत्रे, श्वेता गायकवाड, धनसिंग साळुंखे, सचिन आटकरे, संदेश हजारे, राजू भोगील, सुजित धनवे, धनराज पवार यांच्या सह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, लोकशाहीच्या इतर तीन स्तंभावर अंकुश ठेवण्याचे काम चौथा स्तंभ पत्रकार करत असतो. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. समाजातील वंचित घटकाचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम पत्रकार निभावत असतो.
यावेळी दत्तात्रय राऊत यांनी अध्यक्षीय भाषण केले तर अविनाश बोधले व लियाकत शेख यांनी सूत्रसंचलन केले आभार संजय वारभोग यांनी मानले.