राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शंभूराजे कुस्ती संकुलाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
मंगेश आजबे यांचा गेल्या दहा वर्षांपासून स्तुत्य उपक्रम
गेल्या दहा वर्षापासून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मंगेश (दादा) आजबे रक्तदान शिबीराचे आयोजन करतात याला ग्रामीण भागासह शहरातील तरूणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. रक्तदान करून शेकडो तरूण जिजाऊंना मानवंदना अर्पण करतात.
शंभूराजे कुस्ती संकुल व सुरभी ब्लड बँक अहमदनगर यांच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते यामध्ये तरूणांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरणारे तसेच अनेक सामाजिक कामात पुढाकार घेणारे शंभूराजे कुस्ती संकुलचे प्रमुख मंगेश (दादा) आजबे यांच्या वतीने दरवर्षी जिजाऊ जयंती निमित्त जामखेड येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. यात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंगेश आजबे यांनी केले आहे.
स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ ( माँसाहेब) यांच्या जयंती निमित्त शंभूराजे कुस्ती संकुलचे प्रमुख मंगेश (दादा) आजबे यांच्या वतीने जिजाऊ जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते.
रक्ताचा थेंब कोणाचातरी जीव वाचवू शकतो आधुनिक काळात रक्ताची नितांत गरज असते हे ओळखून शंभूराजे कुस्ती संकुलाच्या माध्यमातून मंगेश आजबे यांनी गेल्या दहा वर्षापासून राजमाता जयंती निमित्त रक्तदान शिबीर घेत आहेत हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवत आहेत.
दि. १२ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता शंभूराजे कुस्ती संकुल च्या वतीने मंगेश कन्ट्रक्शन आँफीस शेजारी नगर रोड जामखेड भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.