जामखेड न्युज ——-
बारा बलुतेदार महासंघाचे व ओबीसी समाज संघटनेच्या जिल्हाउपाध्यक्षपदी शिवकुमार डोंगरे यांची निवड
बारा बलुतेदार महासंघाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी तर ओबीसी समाज संघटनेच्या जिल्हाउपाध्यक्षपदी शिवकुमार डोंगरे यांची निवड
यांची निवड करण्यात आली आहे यामुळे त्यांच्यावर
अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकात दळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहील्यानगर येथे सभा आयोजित केली होती. जिल्हाध्यक्ष माऊली मामा गायकवाड यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले अहील्यानगर येथे जिल्हा अध्यक्ष माऊली मामा गायकवाड यांच्या वाढदिवस साजरा केला यावेळी उपस्थित राज्य बारा बलुतेदार मंहासघाचे जिल्हा अध्यक्ष माऊली मामा गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल इवळे, उपाध्याक्ष भाऊसाहेब कोल्हे, जिल्हा सचिव मच्छिंद्र बनकर, संत महन्त, नगरसेवक व इतर तालुका अध्यक्ष व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मनोगतात माऊली मामा गायकवाड यांनी सांगितले की शिवकुमार डोंगरे यांनी बारा बलुतेदार महासंघाचे जामखेड तालुका अध्यक्ष म्हणून ५ वर्षे चांगल्या प्रकारे काम केले आहे. शिवकुमार डोंगरे हे लिंगायत समाजाच्या शिवा संघटना जिल्हाउपाध्यक्ष, जामखेड तालुका अध्यक्ष OBC समाज तसेच भाजपा तालुका उपाध्यक्ष OBC युवा मोर्चा, लिंगायत समाज अध्यक्ष तथा भाजपा शहर उपाध्यक्ष व इतर अनेक पदावर चांगले काम केले म्हणुन त्यांना आता नवीन जबाबदारी देत आहे असे अध्यक्ष गायकवाड म्हणाले. सर्वानी डोंगरे यांना शुभेच्छा दिल्या व शिवकुमार डोंगरे यांनी आभार मानले.
ओबीसी समाजाच्या अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष पदी शिवकुमार महादेव डोंगरे याची निवड
तर जामखेड तालुका अध्यक्ष पदी नितीन राऊत यांची बिनविरोध निवड झाली.
शिवकुमार डोंगरे यांच्या निवडीबद्दल विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, नगरसेवक अमित चिंतामणी, आकाश बाफना यांच्या सह अनेक मान्यवरांनी व मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.