सुरेश धस हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा सगळीकडे होती पण त्यांना मंत्रीपद मिळाले नाही यामुळे त्यांच्या वर एका अर्थाने अन्यायच झालेला आहे असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. तसेच वाल्मिक कराड प्रकरणी पोलीस प्रशासन कमी पडले आहेत तसेच तिथे खाट आणलेले आहेत पोलीस म्हणतात पोलिसांसाठी आणलेले आहेत तर इतर पोलीस स्टेशनला का नाहीत असा प्रश्न उपस्थित केला.
जामखेड तालुक्यात काही गावांमध्ये आमदार रोहित पवार यांचा अभार दौरा होता यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांला हात घातला सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश यांनी आरोप केला की, परळी मतदारसंघात फक्त बोटाला शाई लावून बाहेर निघून यावे लागत होते. यामुळे अनेक ठिकाणी बोगस मतदान झाले यामुळे धनंजय मुंडे यांना मताधिक्य आहे यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, सुरेश धस हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यांचाच हा आरोप असेल तर देवेंद्र फडणवीस व सरकारने यांची चौकशी करावी व पुन्हा निवडणूका घ्याव्यात.
वाल्मीक कराड विषयी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, याबाबत पोलीस प्रशासन निश्चितच कमी पडले आहे. तसेच त्यासाठी खाटा आणल्याचे सांगितले जात आहे. हे योग्य नाही. राहिलेल्या तीन आरोपींना लवकरात लवकर पकडून देशमुख हत्याकांडातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी व देशमुख कुटुंबला न्याय मिळवून द्यावा असेही सांगितले.
सरकार स्थापन झाले आहे पण अनेक प्रश्न आहेत अनेक मंत्र्यांनी पदभार स्विकारलेला नाही. सरकारचा कसलाही जल्लोष नाही त्यांनाच आणखी खात्री नाही आपण कसे निवडून आलोत ते. सध्या सोयाबीन खरेदी, शिष्यवृत्ती, शिक्षण याबाबत अनेक अडचणी आहेत. सरकारला तर शेतकऱ्याचा सोयबीन घ्यायचाच नाही . कारण काय देयचचं तर बारदाना नाही. राज्यातील सर्व मंत्र्यांना विनंती करतो की, तुम्हाला पदे मिळाली आहेत त्याचा योग्य वापर करा व शेतकऱ्यांचा फायदा करा. बारदाणा नाही म्हणून तुम्ही सोयाबीन खरेदी करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापा-याला कमी भावाने सोयाबीन विकावा लागतो. हा केवळ कर्जत जामखेड मतदारसंघाचा विषय नाही तर महाराष्ट्राचा विषय आहे. याची दखल सरकारने लवकरात लवकर घेऊन लक्ष घालावे असं ही आमदार रोहित पवार यांनी सांगितले.