अमित चिंतामणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सभापती प्रा राम शिंदे यांचे आभार व्यक्त

0
383

जामखेड न्युज——

अमित चिंतामणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सभापती प्रा राम शिंदे यांचे आभार व्यक्त

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने नगराध्यक्ष पदासह पंधरा जागेवर घवघवीत यश संपादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभाही झाली होती.

विकासाच्या मुद्द्यावर जामखेड करांनी भाजपाला भरघोस मताधिक्य दिले. या घवघवीत यशाबद्दल अमित चिंतामणी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सभापती प्रा राम शिंदे यांचे आभार मानले.

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत भाजपाचे पंधरा नगरसेवक व नगराध्यक्ष म्हणून प्रांजल अमित चिंतामणी या 3682 मतांनी विजयी झाल्या आता जामखेड शहराच्या विकासासाठी आता शासनाकडून भरघोस निधी उपलब्ध करून आणण्यासाठी आता काहीही अडचण येणार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सभापती प्रा राम शिंदे यांच्या आभार मानले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, अमित चिंतामणी, नगरसेवक अँड. प्रविण सानप यांनी भेट घेत आभार मानले.

जामखेड शहरासह वाडी वस्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्षम व एकमेव उमेदवार म्हणून प्रांजल अमित चिंतामणी यांच्या कडे पाहिले जात होते. एक विकासाभिमुख चेहरा म्हणून नगराध्यक्ष पदासाठी सर्वच स्तरातून चिंतामणी यांना सर्वाधिक पाठिंबा मिळाला होता. यामुळे नगराध्यक्ष पदी भरघोस मताधिक्याने तसेच नगरसेवक पदी 801 मतांनी विजय संपादन केला.

अमित चिंतामणी यांनी नगरसेवक असताना सर्वात जास्त विकास कामे मार्गी लावली होती. भुमिगत गटाराची संकल्पना जामखेड शहरात प्रथम अमित चिंतामणी यांनी आणली. पेव्हिंग ब्लॉक सह सिंमेट रस्ते अशी कितीतरी दर्जेदार कामे केली. प्रांजल ताईच्या माध्यमातून महिलांचे संघटन, नवरात्र उत्सवात मोहटादेवी दर्शन, ओपन दांडिया कार्यक्रम शहराच्या विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व म्हणून जामखेड करांनी भरघोस मताधिक्य दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here