जामखेड बस डेपो म्हणजे असून अडचण नसून खोळंबा, दररोजच कुठे ना कुठे बस पडतात बंद जामखेड डेपोला नव्या बस मिळाव्यात

0
994

जामखेड न्युज—–

जामखेड बस डेपो म्हणजे असून अडचण नसून खोळंबा, दररोजच कुठे ना कुठे बस पडतात बंद

जामखेड डेपोला नव्या बस मिळाव्यात

एसटीला चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या डेपोंपैकी एक असलेल्या जामखेड डेपोला सध्या समस्यांचा विळखा पडला आहे. कमी गाड्या, जुन्या गाड्या, नादुरुस्त गाड्या, दररोज अनेक ठिकाणी जामखेड डेपोच्या गाड्या बंद पडतात यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या जामखेड तालुक्यातील एसटी डेपोमध्ये एकेकाळी एकूण ७० बस होत्या आता ५५ बस आहेत पण यातील काही बस कामासाठी लावलेल्या असतात यामुळे कमी बसवर आगार व्यवस्थापकाला तारेवरची कसरत करत नियोजन करावे लागते. यातच लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक गाड्या बंद पडतात. यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अनेकांना लांबच्या प्रवासासाठी जायचे असते. आणि जर गाडी बंद पडली तर वेळेवर जाता येत नाही. तसेच अनेकांचे शासकीय कामे ठप्प होतात वेळेवर जाता येत नाही. तसेच महिला व मुलींना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. आज दि. ३ रोजी सकाळी जामखेड नाशिक बस एम. एच. 20 बी. एल. 4260 गाडी जामखेड नगर रोडवर ब्रेक डाउन झाली नगरला शासकीय कामानिमित्त निघालेल्या नागरिकांना वेळेवर जाता आले नाही.
दुसऱ्या गाड्या मागून आल्या तरीही प्रवाशांना घेतले नाही. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. नागरिकांचे हाल रोजचीच घटना झाली आहे. यामुळे जामखेड बस डेपो म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा.

नादुरुस्त गाड्या मुळे अपघात होतात यात प्रामुख्याने चालकालाच जबाबदर धरले जाते; मात्र, डेपोतून बाहेर पडणाऱ्या गाडीची अवस्था ठीक नसेल तर चालकाचाही नाइलाज होतो. एसटीला चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या डेपोपैकी जामखेड डेपो आहे. त्यामुळे याकडे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

चौकट
जामखेड डेपोला नव्या गाड्याची आवश्यकता
जामखेड डेपोमध्ये सध्या ५५ गाड्या आहेत. यातील काही गाड्या नादुरुस्त असतात. यामुळे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागते. दहा ते पंधरा नव्या गाड्याची आवश्यकता आहे.
प्रभारी आगार व्यवस्थापक शशी खटावकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here