जामखेड तालुक्यात अल्पवयीन मुलीचा छेड प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

0
1523

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यात अल्पवयीन मुलीचा छेड प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओ विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहबूब गणी शेख रा. जवळा व अनोळखी एक अशा दोघांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे शाळा काॅलेज परिसरात मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओ मध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला मेहबूब शेख हा मागील एक ते दीड महिन्यापासून त्रास देत होता. सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतरही आरोपीने पीडित मुलीला त्रास देणे सुरूच ठेवल्याने त्रासलेल्या तरुणीने संबंधित बाब आपल्या घरच्यांना सांगितली.

त्यानतंर दि. ३१ मंगळवार दुपारी शाळा सुटल्यावर पीडित मुलगी व तिची मैत्रिणं घरी जात असताना मुलीच्या मागे मागे जात आरोपीने मुलीची छेड काढत, मोटारसायकल आडवी लावून चॉकलेट देत ”मला तू आवडतेस”, असं सांगितले. यावेळी पीडित मुलीने व तिच्या मैत्रिणीने आरडाओरड केल्याने आरोपी व त्यांच्या मित्राने मुलीच्या अंगावर चॉकलेट फेकून देत हिच्याकडे बघून घेऊ म्हणत हळगावच्या दिशेने निघून गेले.

त्यानतंर घडलेल्या सर्व प्रकार पीडित मुलीने घरी आल्यावर आपल्या आई-वडिलांना सांगितलं त्यानतंर काही जणांनी आरोपीच्या मागावर जाऊन आरोपीस पकडून ठेवले. काही वेळाने याबाबतची माहिती पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत घटनास्थळी संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तत्परता दाखवत आरोपी विरोधात दि.३१ मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला.

चौकट
आरोपीस दि.१ वार बुधवार रोजी श्रीगोंदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून,साहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवलकर तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here