राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची सीआयडी चौकशी सुरू—

0
3884

जामखेड न्युज—–

राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची सीआयडी चौकशी सुरू-

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षा व स्टार प्रचारक यांची सीआयडी मार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

वाल्मिक कराड बरोबर काही संबंध होते का? यांची चौकशी सीआयडी मार्फत सुरू असल्याची माहिती
समोर आली आहे. सध्या सोनवणे या जामखेड च्या असून विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या त्या स्टार प्रचारक होत्या.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड सुरु आहे. या प्रकरणात बीड जिल्ह्यात काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या मोर्च्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या अत्यंत निर्घृणपणे केली होती.

या प्रकरणात विधीमंडळात विरोधी पक्ष सदस्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. या प्रकरणातील तीन आरोपी फरार झाले आहेत.
या आरोपींचा महिना होत आला तरीही काहीही ठाव ठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणाचा तपास सीआयडी करीत असून या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची चौकशी सरु असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात संध्या सोनवणे यांची का चौकशी सुरु आहे याची माहिती कळालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here