शैक्षणिक,सामाजिक आणि स्पर्धेत यश संपादन करण्यास उच्चित ध्येय व कठोर परिश्रम केल्यास यश आपल्या समोर स्वतःहून उभे राहते असे कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी सांगितले.
स्वर्गीय देवराव दिगंबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत येथे डी फार्मसी कॉलेजचे अँडमिशन झाले काॅलेज सुरू झाले प्रथम वर्ष तसेच द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांची एकमेकांशी ओळख कार्यक्रम फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अजय वराट यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, प्रमुख पाहुणे डॉ. अजय वराट, प्राचार्य डॉ. गोरक्ष बारगजे, रमेश डिसले, किरण सानप, कैलास माने, कांचन बडे, वैष्णवी मुरूमकर, सन्ना सय्यद, कृष्णा पुलवळे, अशोक नेमाने व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डी फार्म प्रथम वर्षात नव प्रवेशीत विद्यार्थ्यांचा परिचय झाला.