उध्दव आजबे यांच्या घराला आग, संसारोपयोगी वस्तू व मंडपाचे साहित्य जळून खाक
जामखेड नगरपरिषद अंतर्गत असलेल्या जमदारवाडी येथील प्रसिद्ध मंडप व्यावसायिक उद्धव आजबे यांच्या घराला शाॅर्टशर्किटमुळे लागलेल्या आगीत संसार उपयोगी वस्तु लाखो रुपये किंमतीचे मंडप साहित्य जळाले आहे. परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी खुप प्रयत्न केले पण तोपर्यंत संसारोपयोगी वस्तू व मंडपाच्या साहित्याची राख झाली होती.
जामखेड तालुक्यातील जमादारवाडी येथील आजबे वस्ती या ठिकाणी संजय मंडपचे संचालक उध्दव आजबे यांच्या घरात शाॅर्टशर्किटमुळे आज सकाळी आग लागली या आगीत संसार उपयोगी वस्तू व मंडपाचे मोठ्याप्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे.
आज सकाळी सात वाजता लाईट फिटिंग मधुन जाळ व धुर आला त्यामुळे घरातील साहित्याने पेट घेतला आग विझवण्याचा कुटुंबातील सदस्यांनी प्रयत्न केला मदतीला त्यांनी शेजारील रहिवाशांना आवज दिला परंतु आगीचा मोठ्या प्रमाणावर भडका उडाल्यामुळे आग विझवता येईना काही युवकांनी खिडकीवाटे पाणी फेकून आग आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत तीन खोलीतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आसे कुटुंबातील प्रमुख अशोक आजबे यांनी सांगितले.
आग विझवण्यासाठी आग्नीशामक बंब घटनास्थळी आला होता तसेच महसूल व विज वितरणचे कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. उध्दव आजबे यांचा मंडप व्यवसाय आहे त्यासाठी लागणारे मोठे साहित्य त्यांच्या घरात होते त्याच बरोबर कागदपत्रे कपडे धान्य अशा सर्व वस्तू जळुन खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.