मुलीच्या लग्नावरून परतताना वडिलांचा मृत्यू

0
3046

जामखेड न्युज—–

मुलीच्या लग्नावरून परतताना वडिलांचा मृत्यू

मुलीचा विवाह सोहळा मिरजगाव ता. कर्जत येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाल्यानंतर मुलीला सासरी पाठवण्याचा कार्यक्रम झाला यानंतर मोटारसायकल वर घरी परतताना मोटारसायकल व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन वडिलांसह त्यांचे मीत्र यांचा जागीच मृत्यु झाला यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मुलीच्या लग्नानंतर पित्याचे अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (24 डिसेंबर) घडली. याबाबत माहिती अशी, कर्जत तालुक्यातील गुरवपिंपरी येथील बाळासाहेब सूर्यवंशी यांची मुलगी वैष्णवी हीचा विवाह केदार जगताप यांच्यासोबत मिरजगाव येथील पाटील लॉन्स येथे मंगळवारी (24 डिसेंबर) दुपारी दोन वाजता झाला.

मुलीच्या लग्नानंतर मुलीला सासरी पाठवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वडील खुपच भावूक झाले होते. यानंतर आपल्या गावी मोटारसायकल वर घरी परतत असताना मोटार सायकल व ट्रॅक्टर ची समोरासमोर धडक होऊन बाबासाहेब सुर्यवंशी व सदाशिव कागदे (रा.इंदूर, मध्यप्रदेश) या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

यानंतर वैष्णवी हिस सासरी जाण्यासाठी निरोप दिला आणि बाळासाहेब सूर्यवंशी, नातेवाईक दिनेश सदाशिव कागदे (रा.इंदूर, मध्यप्रदेश) हे गुरवपिंपरी येथील घरी येत असताना ट्रॅक्टरची व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here