लागा तयारीला तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार

0
1308

जामखेड न्युज——

लागा तयारीला तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील तीन महिन्यात होतील, असे संकेत दिले आहेत. त्यादृष्टीने भाजपने नियोजनाला सुरवात केली असून 12 जानेवारीला शिर्डीत महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अधिवेशनाला गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराचा शंखनाद या महाअधिवेशनातून करण्यात येणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शनिवारपासून भाजपची (BJP) सदस्य नोंदणी मोहीम सुरवात झाली. विधानसभा निवडणुकी अगोदर पुण्यातील बालेवाडी स्टेडियममधून रणशिंग फुंकण्यात आले होते. आता शिर्डीतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराचा शंखनाद होईल.

दरम्यान, नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात कार्यकर्त्यांना कामाला लागा, असे सांगत येत्या तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असे संकेत दिले. गेल्या पावणेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या रखडल्या आहेत. निवडणूक प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. यावर 4 जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आणि इच्छुकांनी निवडणुकांचा तयारी केली आहे. त्यामुळे या निवडणुकांचा बिगुल कधी वाजणार, याची उत्सुकता आहे.

विधानसभा निवडणुकीतील महायुतीला दमदार यश मिळाले. या निवडणुकीत भाजपने आतापर्यंतच्या सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मागील जवळपास 3 वर्षांपासून रखडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणी जानेवारीत होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी 4 जानेवारी रोजीच होण्याची शक्यता असून, तीन महिन्यांत निवडणुका व्हायला हव्यात, असा प्रयत्न असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे संकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here