ज्ञानराधा पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत आमदार रोहित पवार यांची विधानसभेत मागणी

0
820

जामखेड न्युज——

ज्ञानराधा पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत आमदार रोहित पवार यांची विधानसभेत मागणी

बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटीमध्ये जामखेड मधील सर्वसामान्य खातेदारांचे ९० कोटी रुपयांपेक्षा जास्त अडकले असून या खातेदारांसह इतरही खातेदारांचे हक्काचे पैसे परत देण्यात यावेत आणि या संस्थेसह अशा सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या संस्थांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत मागणी केली.

ज्ञानराधा पतसंस्थेची असणारी मालमत्ता सरकारने ताब्यात घेऊन तसेच विकून सर्व सामान्य गोरगरीब जनतेचे पैसे परत करावेत अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत केली आहे आता सरकार काय करणार याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.
बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टे को-ऑप सोसायटीकडे कर्जत-जामखेड तालुक्यातील सुमारे साडेसहा हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या ९० कोटी रुपयांहून अधिक ठेवी आहेत. परंतु या संस्थेकडून या ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. या संस्थेची चौकशी करुन कारवाई करावी आणि कर्जत- जामखेड मतदारसंघातील ठेवीदारांसह सर्वच ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठीही आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या कडेही मागणी केलेली आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोलमजुरी करण्याची वेळ
मुलांमुलींच्या उच्च शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी विश्वासाने अनेकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेत आपल्या आयुष्याची पुंजी ठेवली, स्वतः च्या पोटाला चिमटा घेऊन, मोलमजुरी करून, सेवानिवृत्ती नंतर उर्वरित आयुष्य व्याजाच्या पैशावर गुजरान करावी म्हणून जामखेड परिसरातील ठेवीदारांनी ज्ञानराधा को – आँप क्रेडीट सोसायटी जामखेड शाखेत जामखेड व परिसरातील ६५०० ठेवीदारांचे ९० कोटी रुपये रूपये ठेव आहेत. त्या लवकरात लवकर मिळाव्यात अशी मागणी आहे.

चौकट –
ज्ञानराधा पतसंस्थेतील पैसे परत मिळत नाहीत या मानसिक धक्क्यातून अनेक ठेवीदारांनी मृत्यू ला कवटाळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here