सावधान! भिकाऱ्यांला भीक देताय, गुन्हा दाखल होणार देशातील या शहरात नवीन वर्षापासून अमंलबजावणी होणार

0
994

जामखेड न्युज——

सावधान! भिकाऱ्यांला भीक देताय, गुन्हा दाखल होणार

देशातील या शहरात नवीन वर्षापासून अमंलबजावणी होणार

मध्य प्रदेशातील इंदूरला भिकारी मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहरात भिकाऱ्यांना पैसे देणाऱ्यावर १ जानेवारी २०२५ पासून गुन्हे दाखल होणार आहेत. जिल्हाधिकारी अशिष सिंह यांनी आधीच इंदूरमध्ये भीक मागण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला असल्याचे सांगितले आहे.

पत्रकारांना या मोहिमेविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी अशिष सिंह म्हणाले, “भीक मागण्याविरुद्धची आमची जनजागृती मोहीम या महिन्याच्या अखेरपर्यंत शहरात सुरू राहणार आहे. त्यानंतर १ जानेवारीपासून कोणीही भीक देताना आढळला, तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे.”
जिल्हाधिकारी अशिष सिंह पुढे म्हणाले की, “मी इंदूरमधील सर्व रहिवाशांना आवाहन करतो की, भीक देऊन पापाचे भागीदार होऊ नका.”

अनेक टोळ्यांचा पर्दाफाश
दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये प्रशासनाने भीक मागायला लावणाऱ्या अनेक टोळ्यांचा पर्दाफश केला आहे. त्याचबरोबर प्रशासनाने अनेक भिकाऱ्यांचे पुनर्वसनही केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशातील १० शहरे भिकारीमुक्त करण्यासाठी प्रकल्प सुरू केला आहे, त्यामध्ये इंदूरचाही समावेश आहे.

भिकाऱ्याने दिले व्याजाने पैसे
भीक मागणाऱ्या विरोधी मोहिमेदरम्यान इंदूर प्रशासनाने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. प्रकल्प अधिकारी दिनेश मिश्रा म्हणाले, “आम्ही अहवाल तयार केल्यावर, आम्हाला आढळले की काही भिकाऱ्यांकडे पक्की घरे आहेत. तर काहींची मुले मुले बँकेत काम करतात. एकदा आम्हाला एका भिकाऱ्याकडे २९ हजार रुपये सापडेले. दुसऱ्या एका भिकाऱ्याने पैसे व्याजाने दिल्याचेही आढळले. आम्हाला राजस्थानहून भीक मागण्यासाठी काही मुले आणल्याचेही सापडले होते. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तेथून त्यांची सुटका करण्यात आली होती.” याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.
मध्य प्रदेशचे समाजकल्याण मंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी सांगितले की, इंदूरस्थित एक संस्था सरकारच्या या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आली आहे. ” ही संस्था भीक मागणाऱ्यांना सहा महिने निवारा देत त्यांच्यासाठी काम शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही लोकांना भीक मागण्यापासून मुक्त करण्यासाठी विविध प्रयत्न करत आहोत.”
अनेकांची सुटका
इंदूर प्रशासन शहरातील भिकाऱ्यांसाचा सतत शोध घेत त्यांना यातून मुक्त करत आहे. सप्टेंबरमध्ये खजराना मंदिर चौकातून १२ भिकाऱ्यांची सुटका करण्यात आली होती. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी शहरातील अन्नपूर्णा मंदिर परिसरातून १० भिकारी आणि ४ मुलांची सुटका करण्यात आली होती. तसेच बालाजी मंदिरातून १२ भिकाऱ्यांची सुटका करण्यात आली होती, असे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे.
इंदौरसह देशातील ३० शहरे भिकारी मुक्त बनवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे.इंदौरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये १४ भिकाऱ्यांना पकडण्यातआलं होतं. एका महिलेकडे ७५ हजार रुपये सापडले होते. तिने फक्त १० ते १२ दिवसात इतके पैसे गोळा केले होते. शहरातकाही अशी कुटुंबे आहेत जी सतत पकडल्यानंतरही पुन्हा पुन्हा भीक मागत आहेत. त्यांच्यावर करडी नजर असल्याचं पोलिसांनी सांगितलं.धार्मिक महत्त्व असलेल्या अयोध्या, ओंकारेशवर, कांगडा,सोमनाथ, उज्जैन, बोधगया, त्र्यंबकेश्वर, पावागढ, मुदैर आणि गुवाहाटी या शहरांमध्ये भिकारीमुक्त अभियान सुरू केलं आहे.याशिवाय पर्यटन स्थळांमध्ये जैसलमेर, तिरुवनंतपुरम,विजयवाडा, कुशीनगर, सांची, केवडिया, श्रीनगर, नामसाई,खुजराहो आणि पाँडिचेरीचा समावेश आहे. तर ऐतिहासिक शहरांमध्ये वारंगल, तेजपूर, कोझिकोड, अमृतसर, उदयपूर,कटक, इंदौर, म्हैसूर, पंचकुला, शिमला आणि तेजपूर या शहरांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here