Sunday, March 29, 2026
Home शैक्षणिक बातम्या आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये जामखेड महाविद्यालय अव्वल

आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये जामखेड महाविद्यालय अव्वल

0
358

जामखेड न्युज——

आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये जामखेड महाविद्यालय अव्वल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धा जामखेड महाविद्यालयात जल्लोषात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये जामखेड महाविद्यालय संघ अंतिम विजेता ठरला तर सी.डी. जैन महाविद्यालय श्रीरामपूर उपविजेता संघ ठरला.

जामखेड महाविद्यालयाच्या प्रांगणात बॉल बॅडमिंटनच्या या स्पर्धा उत्साह पूर्ण वातावरणात पार पडल्या. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जामखेड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी श्रीरामपूरच्या सी. डी. जैन महाविद्यालयाच्या संघावर मात करून अंतिम सामना विजय संपादन केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या अंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धा भरवण्यात आल्या.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रा.फलके ए. बी, यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, विद्यार्थी अवस्थेत तर सांघिक भावना जोपासली गेली तर निश्चितपणे जीवनामध्ये आपण यश मिळवू शकतो. याप्रसंगी नॅक कॉर्डिंनेटर प्रा. गाडेकर सर, डॉ. गोलेकर सर व सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.तसेच अहमदनगर विभागीय क्रीडा समिती चे प्रा. महेश निबाळकर, प्रा. हारदे, डॉ.राजु म्हेत्रे, प्रा. बाळासाहेब शेळके उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रीडा संचालक डॉ. मोहिते ए. डी. यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेसाठी तीन मैदाने तयार करण्यात आली होती. राष्ट्रीय खेळाडू धीरज पाटील प्रल्हाद साळुंखे,गौरव राळेभात वरील सर्व राष्ट्रीय खेळाडूं यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

यास्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. खेळाडूंचे दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव बापु देशमुख, उपाध्यक्ष माअरुण काका चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे, सर्व संचालक मंडळ व प्राचार्य डॉ. एल. डोंगरे यांनी अभिनंदन केले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अण्णा मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी यश मिळू शकले. या स्पर्धेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.डॉ. केळकर जी. डी. यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन प्रा. नितीन तरटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!