पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर्सवरून भाजपाचे नेते गायब

0
198

 

जामखेड न्युज – – – 
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. परंतु या बॅनर्सवर एकाही भाजपच्या बड्या नेत्यांचा फोटो नसल्याने पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने बीड, अहमदनगरमधून अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी मुंबईत या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढून त्यांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. मात्र असे असताना देखील समर्थकांमधील नाराजी कायम असल्याचं या बॅनर्सवरून पुन्हा एकदा उघड झाल आहे.
पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या बॅनर्सवरून भाजपचे बडे नेते गायब
परळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक, उड्डाणपूल अशा महत्त्वाच्या ठिकाणी पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर्स लावले जात आहेत. परंतु या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भाजपच्या बड्या नेत्याचा फोटो नाहीये. पंकजा मुंडे यांनी आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा असल्याचं स्पष्ट केलं. मात्र मुंडे समर्थकांनी मात्र हे स्वीकारलं नसल्याचं या बॅनरवरून तरी सध्या उघड होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here