जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट )
राज्यात अर्थिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जामखेड तालुक्यातील जवळा येथील ज्योती क्रांती कॉ – ऑप क्रेडिट सोसायटीच्या जामखेड शाखेचा १७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. १८ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे.
यावेळी डॉ. प्रशांत गायकवाड, संजय सासवडकर, जगदीश मेनकुदले, राजेंद्र परदेशी, साजिद बागवान, रमेश बांगर, संदीपान हजारे, ईश्वर मुरूमकर, सुभाष गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, शाम मुरूमकर, संदिप बेलेकर, दिपक कांबळे,अरविंद हजारे, दत्तात्रय उबाळे, संजय जावळे, महेश निमोणकर, निलेश उंबरे, बालाजी केवडे, कपिल राऊत, सचिन रासकर सह आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे, व्हा.चेअरमन दशरथ हजारे आणि मा.संचालक मंडळाचे उपस्थितांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. ज्योती क्रांतीचे व्यवस्थापक किरण वर्पे यांनी उपस्थित मान्यवर अतिथी, खातेदार, हितचिंतकांचे आभार मानले. याप्रसंगी ज्योती क्रांतीचे दै.ठेव प्रतिनिधी, बचतगट प्रेरक, तालुका विकासक आणि कर्मचारी उपस्थित होते.
अल्पावधीतच राज्यात नावलौकिक
ज्योती क्रांतीने ग्राहकांचा विश्वास संपादन करत आर्थिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे व राज्यात नावलौकिक मिळविला आहे. सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी ज्योती क्रांतीचे मोठे योगदान आहे. अनेक बेरोजगार युवकांना व्यावसायिक कर्जाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख बनवण्याचे काम केले आहे. आज परिसरातील नागरिकांच्या मनामनांत व घराघरांत विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. या साठी सर्व सहकारी व कर्मचार्यांनी अपार कष्ट घेऊन पतसंस्थेचा वटवृक्ष बनविलेला आहे. व विश्वासाचे नाते निर्माण केले आहे.