कोरोनाचा कहर!!!! अनेक दिवसांनंतर जिल्ह्यात कोरोनाची हजारी पार – पारनेर दोनशेपार तर जामखेड दोनशेजवळ

0
264
जामखेड न्युज – – – – 
 जिल्ह्यात आज कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला असून आज आढळलेली कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी हजाराच्या पुढे गेली आहे. आज रविवारी नगर जिल्ह्यात तब्बल 1 हजार 26 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्हयाची धकधक पुन्हा वाढली आहे. दरम्यान,पारनेर तालुक्याची रुग्णसंख्या आजही जिल्ह्यात टॉपवर पोहोचली आहे. तर त्या खालोखाल जामखेड तालुका आहे. रूग्ण संख्या वाढत चालल्याने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. प्रशासनाने कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
         नगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाने कहर केला असून पारनेर तालुका टॉपवर आहे. पारनेरने आज दोनशेचा आकडा पार केला आहे. तर जामखेड दुसऱ्यास्थानी असून 180 चा आकडा गाठला आहे. तसेच शेवगाव तिसऱ्या स्थानी आले असून 97 चा आकडा गाठला आहे.
आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 246, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 398 तर अँटीजेन चाचणीत 382 असे 1026 कोरोना बाधित आढळून आले.
आजची तालुकानिहाय आकडेवारी अशी.
 पारनेर 210, जामखेड 180, शेवगाव 97, कर्जत 74, संगमनेर 70, नगर ग्रामीण 66, नेवासा 59, पाथर्डी 59, अकोले 52, राहुरी 43, राहाता 26, नगर शहर 23, कोपरगाव 19, श्रीरामपूर 19, श्रीगोंदा 17, इतर जिल्हा 12 असे कोरोना बाधित आढळून आले.
नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हजाराचा आकडा पार केला आहे. याला कारणीभूत ठरत आहेत ते विवाह सोहळे, अंत्यविधी, वाढदिवस व राजकीय कार्यक्रम मात्र प्रशासन व नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. मोठय़ा प्रमाणावर अनावश्यक गर्दी होत आहे. कोरोना नियम पायदळी तुडवले जात आहेत. सर्वच जबाबदारी प्रशासनावर न ढकलता नागरिकांनी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) मास्क व सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे. प्रत्येकाने योग्य काळजी घेतली तरच आपण कोरोनाला हरवू शकतो अन्यथा परत लाॅकडाउन लागू शकते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here