आमदार रोहित पवार यांच्या निवडीबद्दलची रविवारची विजयी रॅली पुढे ढकलली
लवकरच नवीन तारीख कळवली जाईल
विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील उमेदवार आ. रोहीत (दादा) पवार हे निवडुन आल्यानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. याच अनुषंगाने रविवार दि १ डिसेंबर रोजी दुपारी जामखेड शहरातुन भव्य विजयी मिरवणूक रॅली आ. रोहीत दादा पवार मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात येणार होती पण याच दिवशी नवनिर्वाचित आमदारांची मुंबई येथे बैठक असल्यामुळे विजयी रॅली पुढे ढकलण्यात आली आहे.
असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात करण्यात आले आहे. नवीन तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल व भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
पत्रात म्हटले आहे की, रविवार, दि. १ डिसेंबर, २०२४ रोजी दुपारी ०३.०० वा. राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, बलार्ड इस्टेट, मुंबई – ४०० ००१ येथे मा. राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व मा. प्रदेशाध्यक्ष आ. श्री. जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणूक २०२४ मधील पक्षाच्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी आमदार रोहित पवार हे हजर राहणार आहेत. यामुळे रविवारची विजयी रँली रद्द करण्यात आली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.