जामखेड तालुका पाणीदार करण्याचे काम आमदार प्रा राम शिंदे यांचेच – डॉ भगवानराव मुरूमकर
आमदार प्रा राम शिंदे यांच्या कामाचे श्रेय कोणीही घेऊ नये
आमदार प्रा राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात प्रभावी पणे जलसंधारण कामे केली तसेच मनरेगा अंतर्गत जामखेड तालुक्यात सुमारे पाच हजार विहिरी मंजूर करून आणल्या यामुळे जामखेड तालुका पाणीदार झाला आहे. शेतकरी सुजलाम सुफलाम झाला आहे हे सर्व श्रेय आमदार प्रा राम शिंदे यांचेच आहे रोहित पवार यांनी हे घेण्याचा प्रयत्न करू नये जनता रोहित पवार यांना या निवडणुकीत धडा शिकवणार आहे असे जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी सांगितले.
कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार प्राध्यापक राम शिंदे हे नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी झगडणारे नेते आहेत. आमदार प्रा. राम शिंदे हे पाच वर्षे आमदार व पाच वर्ष मंत्री होते.शेतकऱ्यांच्या विविध आंदोलनातही त्यांचा मोठा सहभाग आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे यांचा पराभव झाला होता. अडीच वर्ष विरोधात राहून आमदार प्राध्यापक राम शिंदे हे खचले नाहीत. उलट ते जनतेत व जनतेच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी सरकारला झगडत राहिले.
अडीच वर्षाच्या काळात सत्ता परिवर्तन झाले व महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर आले. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीरी शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले व ते मंजूर करून आणले. खरे तर आमदार प्रा. राम शिंदे हे प्रामाणिक हेतूने काम करत आहेत. परंतु दुसरीकडे रोहित पवार हे श्रेय वादासाठी आडकाठी टाकत आहेत. असे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांनी जामखेड न्यूजशी बोलताना सांगितले.
२६ जून २०२२ साली प्रा. राम शिंदे हे विधान परिषदेवर निवडूनआले.तसेच ३० जून २०२२ साली सरकार सत्तेवर आले. यापूर्वीआमदार रोहित पवार यांच्या कार्यकाळात फक्त १०२ विहीरमंजूर झाले परंतु महायुतीची सत्ता आल्यानंतर आमदार प्रा रामशिंदे यांच्या माध्यमातून ४८१२ विहीर मंजूर झाले व सुरु आहेत. व काही विहीरीचे काम राहिले आहे.