जामखेडच्या श्रेयस वराट ची राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड
ऑल महाराष्ट्र वुशु असोशिएशन आयोजित, परभणी येथे नुकत्याच राज्यस्तरीय ज्युनियर व सब ज्युनियर वुशु स्पर्धा संपन्न झाल्या.यात जामखेडच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण, दोन रौप्य व पाच कांस्य पदक पटकावले.
या स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत जामखेडच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण ,दोन रौप्य व पाच कांस्य पदक पटकावले. यामध्ये सब-ज्युनियर गटामध्ये श्रेयस वराट व ज्युनियर गटामध्ये योगेश वाघमोडे याने सुवर्ण पदक मिळविले. सोहेल शेख व मयूर शिरगिरे यांनी रौप्य पदक प्राप्त केले, तर रोहन धोत्रे, विजय जायभाय, कु.राजनंदिनी गोरे, कु.आरोही पवार ,कु.अंजली लोखंडे यांनी कांस्य पदक मिळविले.
श्रेयस सुदाम वराट या खेळाडूची पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब-ज्युनियर वुशु स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व खेळाडू नवीन मराठी शाळा,जामखेड येथे वुशु जिल्हा संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले व उपाध्यक्ष शाम पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वुशु खेळाचा सराव करत आहे.
सर्व खेळाडूंचे,जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, राज्य संघटनेचे सचिव सोपान कटके, कर्जत-जामखेड चे आमदार रोहित दादा पवार, आमदार प्रा.राम शिंदे, मा.जि.प.सदस्य प्रा.मधुकर राळेभात, उमेश देशमुख, प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य बीके मडके, क्रीडा शिक्षक,मित्र मंडळी नातेवाईक यांच्यासह अनेकांनी हार्दिक अभिनंदन केले.