जामखेड तालुक्यातील तेलंगशी, पिंपळगाव उंडा, बांधखडकमधील शेकडो युवक व जेष्ठ कार्यकर्ते भाजपात दाखल रोहित पवार यांच्या हुकुमशाहीला कंटाळून राष्ट्रवादीला रामराम

0
771
जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील तेलंगशी, पिंपळगाव उंडा, बांधखडकमधील शेकडो युवक व जेष्ठ कार्यकर्ते भाजपात दाखल
रोहित पवार यांच्या हुकुमशाहीला कंटाळून राष्ट्रवादीला रामराम
जामखेड तालुक्यात शनिवारी रात्री मोठा राजकीय भूकंप झाला. रोहित पवारांच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराला कंटाळून जामखेड तालुक्यातील तीन गावांमधील शेकडो युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. कर्जत-जामखेडच्या स्वाभिमान आणि अभिमानासाठी भूमिपुत्रांनी हाती घेतलेल्या निर्णायक लढ्यास यामुळे मोठे बळ मिळाले आहे. तेलंगशी, पिंपळगाव उंडा, बांधखडक गावात झालेल्या राजकीय भूकंपामुळे रोहित पवार गटाला मोठे भगदाड पडले आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा धनशक्ती (पार्सल) विरूध्द जनशक्ती (भूमिपुत्र) अशी थेट लढत आहे. यामुळे सर्वसामान्य गोरगरिब जनतेची मोठी ताकद आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी एकवटली आहे. आमदार शिंदे यांच्या जनसंवाद पदयात्रेने मतदारसंघाचे चित्रच बदलून गेले आहे. आमदार राम शिंदे यांनी मतदारसंघात केलेल्या शाश्वत विकासावर प्रेरित होऊन मतदारसंघातील शेकडो युवक व जेष्ठ कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने भाजपात प्रवेश करण्याचा जोरदार धडाका लावला आहे. ‘दबाव, दडपशाही, गुंडशाही, हिटलरशाही, हुकुमशाही, विविध प्रलोभने या सर्वांना झुगारून गावागावात रोहित पवारांविरोधात बंड सुरू झाले आहे. पाच वर्षे केलेली जाहिरातबाजी, इव्हेंटबाजी आणि गंडवागंडवीच्या विरोधात जनतेचा उद्रेक उफाळून आला आहे.’

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांच्या विजयासाठी ज्यांनी ज्यांनी जीवाचं रान केलं होतं, त्या सर्वांनी विशेषता: तरूण वर्गाने रोहित पवारांविरोधात एल्गार पुकारत आमदार प्रा. राम शिंदे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. रोहित पवारांची साथ सोडत या सर्वांनी भाजपात प्रवेश करण्याचा धडाका लावला आहे. शनिवारी रात्री जामखेड तालुक्यात मोठा राजकीय भूकंप झाला. जामखेड तालुक्यातील तेलंगशी,पिंपळगाव उंडा, बांधखडक या ३ गावातील शेकडो युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला.

तेलंगशी गावातील अशोक ढाळे, शुभम ढाळे, आप्पा ढाळे, ज्ञानेश्वर कातोरे, अवि जावळे, प्रशांत ढाळे, अनिकेत कदम, गणेश ढाळे, आण्णा बेद्रे, अगस्ती कातोरे या कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला.

जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा गावात मोठा राजकीय भूकंप झाला. ग्रामपंचायत सदस्य संतोष गव्हाणे, आकाश ढगे, अमोल ढगे या तीन ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो युवकांनी रोहित पवारांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत भूमिपुत्र आमदार प्रा राम शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. या सर्वांनी शनिवारी रात्री भाजपात प्रवेश केला. यामध्ये अशोक गव्हाणे, आश्रू गव्हाणे, रमजान शेख, साहिल शेख, रशीद शेख, मुबारक शेख, अनंता गव्हाणे, भैरवनाथ ढगे, शिवाजी गव्हाणे, गणेश जाधव, तात्याराम गव्हाणे, पंडित गव्हाणे, रोहन गव्हाणे, संदिप गव्हाणे, संजय गव्हाणे, पंडित गव्हाणे, अकाश ढगे या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला.

बांधखडक येथील कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. बांधखडक येथील चव्हाणवस्ती भागातील बापुराव कुटे, कैलास सुके, महादेव खाडे, अशोक सुके, अविनाश जगताप, प्रविण सुके, संतोष उबाळे, भरत दराडे, भालचंद्र सानप, महादेव दराडे, महादेव चव्हाण, शहादेव खाडे या सर्वांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला.

यावेळी भाजपा नेते तथा माजी उपसभापती रविंद्र सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ, जि.प. सदस्य सोमनाथ पाचरणे, बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील, लाडकी बहिण योजना समितीचे सदस्य बापूराव ढवळे, भाजपा तालुका सरचिटणीस पांडूरंग उबाळे, विलास मोरे, उदय पवार, संतोष गव्हाळे, राहूल चोरगे, नाना आढाव, माजी सरपंच संजय कुटे, विष्णू ढाळे सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here