कर्जत जामखेड मतदारसंघात महाविकास आघाडीला जोरदार हादरा ॲड कैलास (आण्णा) शेवाळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
444

जामखेड न्युज——

कर्जत जामखेड मतदारसंघात महाविकास आघाडीला जोरदार हादरा

ॲड कैलास (आण्णा) शेवाळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

कर्जत-जामखेडच्या रविवारी सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला. काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते ॲड कैलास (आण्णा) शेवाळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा नागपूर येथे रविवारी रात्री संपन्न झाला. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या या मास्टर स्ट्रोकमुळे महाविकास आघाडीला जोरदार हादरा बसला आहे. शेवाळे यांच्या भाजप प्रवेशामुळे आमदार प्रा.राम शिंदेंची राजकीय ताकद वाढली आहे.

यावेळी प्रचाराचे मुद्दे काय आहेत?

जामखेडमधील बहुसंख्य शेतकरी कोरडवाहू शेती करतात. मतदारसंघात उद्योगधंदे नाहीत.

एमआयडीसी आणण्यावरून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मविआचे सरकार गेल्यानंतर प्रत्येक अधिवेशनात रोहित पवार या मुद्द्यावरून आंदोलन करताना दिसतात.

कर्जत जामखेडच्या प्रचारात यंदा ‘भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा’, ‘कर्जत जामखेडचा विकास,’ अशा टॅगलाईन्स आणि यासोबतच वेगवेगळ्या जातीय समिकरणांची जुळवाजुळव पुन्हा एकदा केली जाते आहे.

एकीकडे रोहित पवारांनी त्यांच्या कार्यकाळात कर्जत-जामखेडसाठी हजारो कोटींचा निधी आणि वेगवेगळ्या योजना आणल्याचा दावा केलाय तर दुसरीकडे राम शिंदे यांनी महायुती सरकारची कामे, स्थानिक असल्याचा मुद्दा आणि 2019 आधी त्यांनी केलेल्या कामांचा दाखला देत प्रचाराला सुरुवात केली आहे.

याबाबत बोलताना रोहित पवार यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितलं की, “माझ्या विकासकामांची यादी सांगायची झाली तर पाच ते सहा तास बोलावं लागेल. यासाठी आम्ही 210 पानांचं पुस्तक छापलेलं आहे. आम्ही विविध विभागांच्या मदतीने कर्जत जामखेडमध्ये 3800 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. आम्ही इथे आरोग्यसेवा चांगली केली, शिक्षणाच्या सोयीसुविधा वाढवल्या, शेतीसाठी खूप मोठं काम केलं, रुग्णवाहिका सुरु केल्या. आम्ही खूप मनापासून काम केलं आहे.”

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राम शिंदे यांनी जामखेड न्युजशी संवाद साधला
“माझ्या विरोधकांनी लोकांची फसवणूक केलेली आहे आणि त्यांनी फक्त आश्वासनं दिली आहेत. भटक्या विमुक्त समाजाबाबत मी अनेक कामं केली आहेत. यासोबतच अनेक विकासकामे देखील मी केली आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की यंदा कर्जत जामखेडचे मतदार संधी देतील असा विश्वास आहे.”

2019च्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांच्या नावसारखीच नावे असलेल्या उमेदवारांनी देखील बक्कळ मते घेतली होती, यंदा देखील असाच प्रयोग केला जातोय.

राम शिंदे नावाच्या एकूण 3 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर रोहित पवार नावाच्याही तीन जणांनी आमदारकीची निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय. त्यापैकी दोघांनी माघार घेतली असली तरी एक उमेदवार अजूनही रिंगणात आहे.

आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे रोहित पवार यांचे चिन्ह ‘तुतारी’ असले, तरी अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना ‘ट्रम्पीट’ (पिपाणी) हे चिन्ह मिळाले आहे. याच चिन्हाने लोकसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाची डोकेदुखी वाढवली होती.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तब्बत 44 हजार मते घेतली होती. त्यामुळे आमदार रोहित पवार यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here