Home राजकारण कोरोना व लंपी आजारा ढोंगी भुमीपुत्र कोठे होते – रोहित पवार जामखेडमध्ये...
जामखेड न्युज——
कोरोना व लंपी आजारा ढोंगी भुमीपुत्र कोठे होते – रोहित पवार
जामखेडमध्ये सहकार मेळावा मोठ्या गर्दीत संपन्न
भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस पांडुरंग माने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल

कोरोना माहामारी तसेच लंपी आजाराच्या वेळी सध्या कर्जत जामखेड मतदारसंघात भुमीपुत्र म्हणून मिरवणारे ढोंगी भुमीपुत्र कोठे होते. आपण कोरोना काळात लोकांना दिलासा देण्यासाठी कोविड सेंटर उभारून उपचार केले तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण कर्जत जामखेड मतदारसंघात केले आपण लोकांना दिलासा देत होतो आणी स्वत:ला भुमीपुत्र म्हणून घेणारा ढोंगी भुमीपुत्र कोठे होता असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.

जामखेड येथे जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व माजी सभापती सुधीर राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी रोहित पवार, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात, उपसभापती कैलास वराट, विठ्ठल चव्हाण, गजानन शिंदे, सतिश शिंदे, नारायण जायभाय, राहुल बेदमुथ्था, मंगेश आजबे, दत्तात्रय वारे, संजय वराट, राजेंद्र कोठारी, सुर्यकांत मोरे, प्रशांत राळेभात, विश्वनाथ राऊत, सखाराम भोरे, हनुमंत पाटील, डॉ. अविनाश पवार, सुंदरदास बिरंगळ, सुरेश पवार, बिभीषण धनवडे, संदीप गायकवाड, बापुसाहेब कार्ले, सुनील उगले, प्रा. महादेव डुचे, शिवाजी डोंगरे यांच्या सह सेवा सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, आपण विकासाचे राजकारण करत आहोत. विरोधक ढोंगी पणा करत आहेत. विरोधकांना त्यांनी विकासाबाबत समोरासमोर येण्याचे आव्हान केले. तसेच भाजपा प्रवेश रात्रीचे का होतात असा सवाल उपस्थित केला. मी पाच वर्षे तुमची इनामे इतबारे सेवा केली आहे.

मी मोठ्या मताधिक्याने निवडून येणार व सरकारही येणार शेतीसाठी पाणी आणणारच तसेच एमआयडीसी सुरू करणारच असे सांगितले. याचबरोबर सध्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दहशत सुरू आहे तिचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही, विरोधक साडेचार वर्षे घरात बसतात व सहा महिनेच लोकांमध्ये येतात असे पवार यांनी सांगितले.

यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट म्हणाले की, आरोग्य, रस्ते, वीज, महिला सक्षमीकरण, कृषी या क्षेत्रात उल्लेखनीय काम रोहित पवार यांचेच आहे. कामाच्या बळावर मोठ्या मताधिक्याने रोहित पवार विजयी होणार आहेत.

यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात म्हणाले की, जामखेड तालुक्यातील सहकार रोहित पवार यांच्या बरोबर आहे. हे मेळाव्यातून दिसून येत आहे. कर्जत जामखेड च्या विकासासाठी रोहित पवारच आवश्यक आहेत.
रोहित पवार यांनी मंत्री झाल्यावर शेतकरी कर्जमाफी निर्णय घ्यावा असे आवाहन केले
रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार हे भाग्य आहेत. दादा पाच वर्षे लोकात आहेत. समोरचे फक्त निवडणूक लागल्यावरच दिसतात.

चोकट
भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस पांडुरंग माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांच्या बरोबर नितीन राऊत यांनीही प्रवेश केला. यावेळी पांडुरंग माने यांना विभाग प्रमुख.विमुक्त जाती भटक्या जमाती. उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा पदी नियुक्ती पत्र दिले.

error: Content is protected !!