जामखेड न्युज ——–
जामखेड तालुक्यातील खामगाव येथे दरोडा, सोन्याचा ऐवज लंपास, एक जण गंभीर जखमी
तालुक्यातील खामगाव येथे रात्री एक वाजता चार अज्ञात चोरट्यांनी वाघमोडे वस्ती येथे आश्रू नामदेव वाघमोडे वय 70 यांच्या घरात घुसून मुलगा झोपलेल्या घराला बाहेरून कडी लावून उचकापाचक सुरू केली यावेळी आश्रू वाघमोडे जागे झाले असता लोखंडी राँडने डोक्यावर फटका मारला यात ते जखमी होऊन खाली पडले. त्यांच्या डोळ्याला व डोक्याला मार लागला आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

आश्रू वाघमोडे यांच्या सुनबाई व पत्नीच्या गळ्यातील सोने तसेच नातवाच्या कानातील सोने चोरट्यांनी चोरून नेले तसेच यावेळी नातवाच्या कानाला जखम झाली तसेच सहा महिन्याचे बाळ देखील तुडवले यात तेही जखमी झाले.


चोरट्यांच्या हातात तलवार, सत्तूर, लोखंडी राँड होते. घरात आरडाओरडा झाल्यानंतर सोन्याचा ऐवज घेऊन चोरटे अंधाराचा फायदा घेत शेतात पसार झाले. साधारण एक लाख बारा हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला.

जखमी आश्रू वाघमोडे यांना रात्री जामखेड येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यांच्या डोळ्यांना जखम झाली असून डोक्याला सात टाके पडले आहेत.








