जामखेड न्युज——
रोहित पवार सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे राजकारण करतात – सुनंदाताई पवार
विरोधक जातीपातीचे राजकारण करून मते मागतात
आमदार रोहित पवार यांनी पाच वर्षांत सर्वांना बरोबर घेत रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात सर्वांना बरोबर घेत विकासाचे राजकारण केले कधीही जातपात पाहिली नाही. विरोधक मात्र
जातीच्या नावावर मते मागतात ही शोकांतिका आहे. असे सुनंदाताई पवार यांनी सांगितले.
मागील विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही महिला व नागरिकांनी रोहित पवार यांना निवडून दिले त्यांनी पाच वर्षात काम करताना शिक्षण आरोग्य व पाणी वाटप करताना कधीही कोणत्या पक्षाचा आहे हे विचारता सर्व समाजाला बरोबर घेऊन कामे केली परंतु विरोधक जातीपातीचे राजकारण करून मते मागतात त्यांना त्यांची जागा मताच्या रूपाने दाखवून द्या असे आवाहन सुनंदाताई पवार यांनी केले.
त्या खर्डा येथे चौंडेश्वरी मंदिरावर आयोजित महिलांच्या मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राजश्री मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, ग्रामपंचायत सदस्य दादा जमकावळे, अशोक खटावकर, सुनील साळुंखे, राजेंद्र गोलेकर, मुकुंद आप्पा गोलेकर, पोपट भुते, दत्तात्रय भोसले, कल्याण सुरवसे, शशिकांत गुरसाळी इत्यादी उपस्थित होते.
सुनंदा पवार पुढे बोलताना म्हणाल्या की, आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी अतिशय मेहनत घेतली आहे. विकास योजना मार्गी लावण्याचे काम केले. प्रत्येक ठिकाणी लढणारा, विधानसभेत कर्जत जामखेड चे प्रश्न मांडणारा, सरकारच्या विरोधात भिडणारा, इडीच्या कारवाईला सामोरे जाणारा अशी त्याची महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे.