जामखेड मध्ये भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अँब्युलन्स वाँर
प्रशासनावर पक्षपाती पणाचा राजेंद्र कोठारी यांचा आरोप
आमदार रोहित पवार यांच्या एका संस्थेच्या वतीनेगेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघात प्रभागवार अँब्युलन्स आजारी लोकांना गोळ्या व औषधे वाटप करत आहे. या अँब्युलन्स वर उमेदवाराचे नाव नाही पक्षाचे चिन्ह नाही भाजपा कार्यकर्त्यांनी ती अडवली व पोलीस स्टेशन व निवडणूक पथकास बोलावले त्यांनी सर्व तपासणी केली पण आक्षेपार्ह काहीही आढळले नाही. तेव्हा भरारी पथकाने कर्जत जामखेड निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी यांचे मार्गदर्शन घेतले तेव्हा त्यांनी सांगितले की गोळ्या औषधे वाटण्याची परवानगी घ्यावी यानंतर वाटण्यास परवानगी द्यावी तो पर्यंत वाटप बंद करावे.
यानंतर अँब्युलन्स आँफिसला घेऊन जात असताना पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी खर्डा चौकातून अँब्युलन्स पोलीस स्टेशनला आणण्यासाठी सांगितले यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणावर जमा झाले.
रूग्णांना गोळ्या औषधे वाटप करणाऱ्या गाडीत काहीही आक्षेपार्ह नसताना कशासाठी पोलीस स्टेशनला आणली व काय गुन्हा दाखल करतात जुन्या पोलीस स्टेशन समोर भाजपा पक्षाचे चिन्ह व उमेदवाराचा फोटो असताना त्या अँब्युलन्स वर कारवाई नाही आणि आमच्या अँब्युलन्स मध्ये काहीही नसताना कारवाई असे एकतर्फी का वागतात म्हणून जाब विचारला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जामखेड येथील जुन्या तहसील कार्यालयात जेलसमोर भाजपा उमेदवाराचा फोटो, पक्षाचे चिन्ह असलेली गाडी दाखवली तेव्हा निवडणूक पथकाने पोलीस स्टेशनला अँब्युलन्स आणली.
रात्री उशिरा पर्यंत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर पोलीस स्टेशनला हजर होते दोन्ही बाजूंनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पण उशिरा पर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून गोरगरीब रुग्णांना औषधे वाटप करणारी अंँब्युलन्सतपनेश्वर रोड वर काही भाजपा कार्यकर्त्यांनी अडवून पोलीस स्टेशनला आणली मात्र आरोग्य विभागाची भाजपा उमेदवाराचे चिन्ह नाव असलेली अँब्युलन्स असताना यावर गुन्हा नाही कारवाई नाही हा पक्षपात प्रशासनाकडून सुरू आहे.
चौकट एका भाजपा कार्यकर्त्यांने सोशल मीडियावर आमदार रोहित पवार यांची अँब्युलन्स पैसे वाटप करताना पकडली म्हणून माहिती व्हायरल केली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागले. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पण दोन्ही बाजूंकडून समजूतदारपणा दाखवत सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करावयास लावले व गुन्हा न दाखल करण्याची भूमिका घेतली. रात्री उशिरा पर्यंत पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.