यशवंत सेनेचा धनगर उमेदवारांसह महायुतीला पाठिंबा राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले
जामखेड येथे पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट
यशवंत सेनेच्या चौंडी येथील उपोषणासह इतर आंदोलनामुळे धनगर समाजाला विविध राजकिय पक्षांकडून उमेदवारी देण्याचे प्रमाण वाढले आहे. तर महायुती सरकारनेही या आंदोलनाची दखल घेत आरक्षण अमलबजावणी व इतर योजनांबाबत सकारात्मक भुमिका घेतल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर यशवंत सेनेने राज्यातील धनगर उमेदवारांसह महायुतीला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी घोषणा यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी पत्रकार परिषदेत केले.
बी.के. कोकरे प्रणित यशवंत सेनेची राज्यातील विधानसभा निवडणूकांतील भूमिका स्पष्ट करण्यासाठी अयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले म्हणाले “२०१४ नंतर थंडावलेल्या धनगर आरक्षण मागणीसाठी यशवंत सेनेने २०२३ मध्ये २१ दिवसाचे आमरण उपोषण केल्यानंतर सदर धनगर आरक्षणाची चळवळ महाराष्ट्रभर पेटली व राज्यात अनेक ठिकाणी आदोलंने उभी राहिली.
दरम्यान महायुती सरकारने यशवंत सेनेच्या मागणीला प्रतिसाद देत धनगर आरक्षण अभ्यासाठी डॉ. शिंदे समिती स्थापना केली व समितीने अहवालही सादर केला आहे व याच महायुती सरकारने धनगर आरक्षणातील प्रमुख अडचण धनगड हा राज्यात राहत नाही असे लेखी दिले व खिल्लारे कुटूंबीयाचे धनगड असलेले प्रमाणपत्रे रद्द केली त्यामुळ धनगर आरक्षण अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
आणि हेच महायुतीचे सरकार करु शकते असा या राज्यातील धनगर समाजाला विश्वास आहे म्हणुन यशवंत सेनेच्या राज्यातील सर्व पदधाकाऱ्यांनी व यशवंत सेनेच्या कोअर कमीटीने बठकीमध्ये असा निर्णय घेतला की धनगर समाजातील प्रमुख पक्षांच्या उमेद्वारांसह या राज्यातील महायुतीला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष, प्रा. माणिकराव दांगडे पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष, आण्णासाहेब रुपनर, संघटक जी.बी. नरवटे, प्रदेश सचिव नितिन धायगुडे, प्रदेश उपाध्यक्ष, दादासाहेब केसकर, समाधन पाटील, बाबासाहेब भाजने, दिलीप गडदे, किरण धालपे, मराठवाडा नेते साईनाथ सोलाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.