प्रा राम शिंदे यांच्या काळातच रत्नापूर सुजलाम सुफलाम झाले – सुहास वारे रोहित पवार यांना खुश करण्यासाठीच रत्नापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची गंडवागंडवी

0
2158

जामखेड न्युज——–

प्रा राम शिंदे यांच्या काळातच रत्नापूर सुजलाम सुफलाम झाले – सुहास वारे

रोहित पवार यांना खुश करण्यासाठीच रत्नापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची गंडवागंडवी

रत्नापूर परिसराचा कायापालट माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या काळातच झालेला आहे. मागील पाच वर्षांत रोहित पवार यांनी एखादे काम दाखवावे, रत्नापूर येथे भाजपमध्ये झालेले प्रवेश हे स्वखुशीने झालेले आहेत चौदा पैकी बारा तर आजही आमच्या बरोबरच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा गंडवागंडवीचा धंदा उघड झालेला आहे
असे भाजपाचे युवा नेते तालुका उपाध्यक्ष सुहास वारे यांनी सांगितले.
रत्नापूर येथे झालेल्या भाजपा प्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता वारे व सुर्यकांत मोरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा प्रवेश कसे झाले हे सांगितले होते. आज भाजपाचे युवा नेते व रत्नापूर येथील कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले.
यावेळी सुहास वारे बोलताना म्हणाले की, चौदा कार्यकर्त्यांनी स्वखुशीने काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यातील बारा जण आजही आमच्या बरोबर आहेत. दोन कार्यकर्त्यांना कशी दमबाजी केली यासाठी माजी सभापती यांची काँल हिस्टरी तपासावी असे सांगितले.

रत्नापूर येथील दोन नेत्यांनी गंडवागंडवी चा कळस गाठला आहे. गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू व जेवण वाटप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याबाबत काहीही बोलले नाहीत. खोटे बोल पण रेटून बोल असे लबाडीचे दुकान सुरू आहे. यांचे दुकान वीस तारखेपर्यंत चालणार आहे. नंतर त्यांचे दुकान कायमचे बंद होईल. फुकटचे श्रेय घेण्याचा धंदा सुरू आहे. तो त्यांनी बंद करावा. 

 

रत्नापूर परिसराचा कायापालट माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे यांच्या काळात झालेला आहे. आमदार रोहित पवार यांच्या पाच वर्षांच्या काळात एखादे काम दाखवावे. गावातील नेत्यांची आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वर बोलायची पात्रता नाही. असे सुहास वारे यांनी सांगितले.

यावेळी विकास मोरे, अशोक मोरे, दत्ता गिरी यांनी बोलताना रत्नापूर येथील नेते दत्ता वारे व सुर्यकांत मोरे यांचा खरपूस समाचार घेतला व या दोन्ही नेत्यांची भुमीपुत्राला साथ द्यावी असे आव्हान केले
तसेच ते सध्या ज्या ठिकाणी आहेत तेथे त्यांना कसलाही मानपान नाही. तसेच सभापती काळात सभापती निवास मध्ये काय काय धंदे चालत होते हे त्यांनी सांगावे. असे आव्हान दत्ता गिरी यांनी केले. 

चौकट

जे कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता ते आजही भाजप मध्येच आहेत. उलट राष्ट्रवादी काँग्रेस मधीलच कार्यकर्त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश परत दाखवला जात आहे. फक्त गंडवागंडवी चालू आहे. आमदार रोहित पवार यांना खुश करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here