जामखेड न्युज——
खर्डा किल्ल्याच्या विजयाच्या शौर्यगाथेला २९९ वर्षे झाल्याबद्दल किल्यावर ३०० दिवे
दीपोत्सवाने उजळून निघाला ऐतिहासिक शिवपट्टनचा भुईकोट किल्ला
जामखेड तालुक्यातील शिवपट्टन (खर्डा) ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. मराठे व निजाम यांच्यातील शेवटची लढाई यात मराठ्यांचा विजय या विजयास २९९ वर्षे पूर्ण झाले विजयाच्या शौर्यगाथेची आठवण म्हणून किल्यावर ३०० दिव्यांनी ऐतिहासिक शिवपट्टनचा भुईकोट किल्ला उजळून निघाला.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मराठ्यांच्या विजयाची शौर्यगाथा लाभलेल्या मराठ्यांच्या विजय परंपराची खुणा जिवंत ठेवणाऱ्या खर्डा भुईकोट किल्ला येथे सोमवार ४/११/२०२४ रोजी खर्डा किल्ल्याला ११/३/२०२४ रोजी २२९ वर्ष पूर्ण झाले याबद्दल २३० दिवे लावून फटाक्यांची आतिषबाजी करत हिंदवी स्वराज दीपोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी खर्डा किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन गोरक्षक ऋषी कामटे, संजय काशीद बबलू टेकाळे यांच्या प्रमुख हस्ते प्रतिमा पूजन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. किल्ल्यासह संपूर्ण किल्ला परिसरात २३० दिवे लावून फटाक्याची आतिषबाजी करून हिंदवी स्वराज दीपोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान खर्डा विभाग प्रमुख बबलू निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक संतोष थोरात, केमिस्ट असोसिएशनचे बाळासाहेब दिंडोरे, अखिलेश शिंदे एड पप्पू थोरात, विवेक योगे, सागर शहा, घनश्याम भोसले, भाऊ भोसले, ओंकार सातारकर, संकेत काळे, आकाश सुरवसे, सरस्वती जोरे, आरती सहानी, ललिता निकम, रब्बा शेख, अनील धोत्रे, धनसिंग साळुंके, योगेश बागडे यांच्यासह शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, शहरातील युवक, धाराशिव जिल्ह्यातील वाशी, भूम, परंडा येथील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित युवक व महिलांनी दीपोत्सव मध्ये सहभाग नोंदवला तसेच शिर्डी हैदराबाद राज्य महामार्ग जाणाऱ्या पर्यटक यांनी ऐतिहासिक किल्ल्यावरील दीपोत्सव चा क्षण आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये टिपला व या दीपोत्सवामध्ये पर्यटकांसह शिवप्रेमी, ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने जुन्या ऐतिहासिक जाणीवची उजाळा मिळाल्याचे पहावयास मिळाले.
तसेच जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव च्या घोषणा नी खर्डा किल्ला परिसर दणाणून गेला.