जामखेड न्युज——–
प्रा. राम शिंदे यांच्या विजयासाठी प्रा सचिन गायवळ मैदानात
कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार विरुद्ध आमदार प्रा. राम शिंदे असा सामना होत आहे. राज्यातील हाय होल्टेज लढतीपैकी या लढतीकडे पाहिले जात आहे. प्रा. राम शिंदे यांच्या विजयासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायली यांनी अतिशय सुक्ष्म नियोजन केले असून गावभेटी, काँर्नर सभा यांच्या माध्यमातून सर्व मतदारांपर्यंत पोहचत आहेत. प्रा राम शिंदे यांच्या विजयासाठी प्रा सचिन गायवळ यांनी कंबर कसली आहे.
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार या दोघांमध्ये सरळ लढत अटितटीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मागील 2019 च्या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांचा प्रचार करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांनी यावेळी जामखेडचे भूमिपुत्र आ.राम शिंदे यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी खर्डा जिल्हा परिषद गटा सहित जामखेड तालुक्यात प्रत्येक गावात जाऊन कॉर्नर सभेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोट आवळली असून आमदार शिंदे यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.
प्रा. सचिन सर गायवळ हे सोनेगाव येथील भूमिपुत्र असून त्यांनी जामखेड तालुक्यातील खर्डा जिल्हा परिषद गटात सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वेळोवेळी युवक, महिला व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. विशेषता खर्डा जिल्हा परिषद गटात सर्व जाती-धर्मांच्या लोकांबरोबर कामाच्या माध्यमातून त्यांनी संबंध निर्माण केले आहेत.
गेली दोन वर्षापासून त्यांनी खर्डा शहर व परिसरात गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, दीपावली शुभेच्छा, संक्रातीच्या माध्यमातून तिळगुळ वाटप तसेच प्रत्येक कार्यकर्त्याला वेळोवेळी त्यांनी कामाच्या माध्यमातून मदत केलेली आहे.
तसेच खर्डा व परिसरातील मागील झालेल्या अनेक गावच्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचे काम त्यांनी केले आहे, त्यामुळे अनेक गावातील संघर्ष व गाव पातळीवरील कार्यकर्त्यांचा निवडणुकीत होणारा खर्च वाचविण्याचे काम प्रा. सचिन गायवळ यांनी केले आहे.
मागील निवडणुकीत त्यांनी आमदार रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रचार करून प्रामाणिक प्रयत्न केले होते. परंतु नंतर आमदार रोहित पवार हे सचिन सर गायवळ यांना अनेक कार्यक्रमात टाळत होते.
येथील स्थानिक तालुक्यातील दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या जवळ त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करून तेढ निर्माण केल्यामुळे सचिन सर गायवळ हे आमदार पवारांपासून दूर होत गेले, नंतर त्यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हातात घेतले. तसेच ते पुढे आमदार राम शिंदे यांच्या संपर्कात गेले.
येणाऱ्या 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी आमदार राम शिंदे यांना निवडून आणण्यासाठी वैयक्तिक गाठीभेटी, प्रचार सभा व कॉर्नर सभेच्या माध्यमातून कंबर कसली असल्याचे चित्र अनेक गावात निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.