जामखेड न्युज——
भाजप प्रवेशाचा रत्नापुरकरांकडून पर्दाफाश
भाजपाचे प्रवेश रात्रीच कसे होतात – सुर्यकांत मोरे
प्रा. राम शिंदे यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी – दत्ता वारे
विधानसभा निवडणुकी दरम्यान अनेक पक्ष प्रवेश बातम्या येतात यामध्ये बारकाईने पाहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस चे पक्ष प्रवेश उत्फुर्त आमदार रोहित पवार यांच्या विकास कामामुळे दिवसा राजरोसपणे होतात तर भाजपाचे पक्ष प्रवेश हे रात्री अकरा नंतर बळजबरीने होतात असा हल्ला बोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी सभापती सुर्यकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
काही दिवसांपूर्वी रत्नापूर येथील काही कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश अशी बातमी होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता वारे व सुर्यकांत मोरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपात गेलेले कसे बळजबरीने गळ्यात भाजपाचा पंचा टाकला जातो याची चांगलीच पोलखोल केली.
यावेळी बोलताना सुर्यकांत मोरे म्हणाले की भाजपा नेते व कार्यकर्ते यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. गावातील काही कार्यकर्त्यांना बाहेर नेऊन जेऊ खाऊ घालणे व्यसनाच्या आहारी घालणे व शिंदे सर कोठे आहेत हे पाहून हे कार्यकर्ते तिथे घेऊन जाणे आणि पक्ष प्रवेश करायचा म्हणणे असा सगळा प्रकार सुरू आहे. रत्नापूर चे कार्यकर्ते रोहित पवार यांनाच मानणारे आहेत भाजपाला दोन अंकी मते मिळतील की नाही याची खात्री नाही.
तसेच शिंदे सर जलसंधारण मंत्री असताना तालुक्यात कोठेही बंधारा केलेला नाही आमच्या ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे रत्नापूर येथे तीन बंधारे झालेले आहेत. यामुळे रत्नापूर बागायती आहे. याचे श्रेय ग्रामस्थांना आहे.
आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विकास कामामुळे जनता रोहित पवार यांच्या बरोबर आहे. त्यामुळे रोहित पवार हे एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहेत. भाजपाने ही निवडणूक खालच्या थराला नेऊन ठेवली आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी असे आव्हान दत्ता वारे यांनी केले.
तसेच आमदार रोहित पवार यांची प्रशासनावर पकड आहे. आमदार प्रा राम शिंदे मंत्री असताना जामखेड शहरात जवळ जवळ सर्वच अधिकारी प्रभारी होते. रोहित पवार आमदार झाल्यानंतर त्यांनी चांगले अधिकारी आणले होते.
जनतेच्या हितासाठी ते पोलीस अधिकारी यांना बोलले कारण जामखेड चे पोलीस अधिकारी कार्यकर्त्यांना कोणत्या पक्षाचे विचारून वागणूक देतात म्हणून वर्दीतील कार्यकर्ते असणाऱ्या अधिकाऱ्यांचा समाचार घेणार असे सांगितले होते.
रोहित पवार हे जनतेच्या हितासाठी पोलीस अधिकारी यांना बोलले आमदार प्रा राम शिंदे यांची अधिकाऱ्यावर कसलीही पकड नाही.