ट्रकला इलेक्ट्रॉनिक तारेला करंट बसून चालकाचा जाग्यावरच मृत्यू
कर्जत तालुक्यातील दुरगाव येथून विटा भरून सिताराम गड खर्डा ता. जामखेड येथे जात असताना हाय टेन्शन इलेक्ट्रॉनिक तारेला लागुन स्पार्क होवून ट्रक चे मागील दोन टायर फुटून मयत चालकाचा जाग्यावरच मृत्यू झाला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
राम मच्छिंद्र निंबाळकर वय 40 वर्ष दुरगाव ता.कर्जत येथून वीटा भरून जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सिताराम गडावर येत असताना महावितरणच्या मुख्य तारेला ट्रक चा स्पर्श झाला खाली चिखल होता यामुळे ट्रक मध्ये करंट उतरला यामुळे ट्रक चे टायर फुटले यामुळे चालक खाली उतरत असताना करंट बसून राम मच्छिंद्र निंबाळकर यांचा जाग्यावरच मृत्यू झाला.
सिताराम गड खर्डा येथे महावितरणच्या तारा खुपच खाली होत्या यामुळे ट्रक ला तारेचा स्पर्श झाला आणि ट्रक मध्ये करंट उतरला यामुळे टायर फुटल्याने चालक खाली उतरत असताना करंट बसल्याने जाग्यावरच मृत्यू झाला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मयत राम मच्छिंद्र निंबाळकर यांची घरची परिस्थिती गरीबीची आहे. त्यांच्या मागे तीन मुली, एक मुलगा, पत्नी, वडील असा परिवार आहे.वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले.
घटनेची माहिती कळताच दुरगाव ता कर्जत येथील नातेवाईक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. रात्री उशिरा पर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. नातेवाईक आक्रमक होते. महावितरण वर गुन्हा दाखल करावा व मयताच्या नातेवाईकांना मदत मिळाली अशी मागणी होती.
खर्डा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महावितरणचे अधिकारी खांडेकर म्हणाले की, आम्ही रिपोर्ट पाठवला आहे. अधिकारी पंचनामे करण्यासाठी येतील.