प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांची तोफ धडाडणार
राज्यातील हाय होल्टेज लढत म्हणून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ ओळखला जात आहे. या ठिकाणी माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार अशी लढत होत आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे गुरूवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राशिन येथे येत आहेत.
227 कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार विरुद्ध आमदार प्रा राम शिंदे असा सामना होत आहे. एकुण अकरा उमेदवार असले तरी खरी लढत दुरंगीच होत आहे.
मागील पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत रोहित पवार यांना १ लाख ३५ हजार ८२४ मते मिळाली. तर भाजपच्या राम शिंदे यांना दुसऱ्या क्रमाकांची ९२ हजार ४७७ मते मिळाली होती. 43347 मतांनी रोहित पवार विजयी झाले होते. या निवडणुकीत मात्र दोन्ही उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली आहे.
केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतीरादित्य शिंदे हे गुरूवारी दि. ७ नोव्हेंबर रोजी राशिन येथील सकाळी अकरा वाजता भोलेनाथ चौक ग्रामपंचायत कार्यालयासमोर राशिन येथे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सभा होत आहे.
सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट, आरपीआय आठवले गट, रयत क्रांती पक्ष, महायुतीचे मित्र पक्ष यांनी केले आहे.
227 कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा राम शिंदे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची मुलूख मैदानी तोफ राशिन मध्ये गुरूवारी येत आहे.
राशिन येथील भाजपाचे नेते राजेंद्र देशमुख यांनी नुकतेच भाजपाला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केला यामुळे येथेच ज्योतिरादित्य शिंदे यांची सभा ठेवली आहे.