जामखेड न्युज——
बाफना परिवाराच्या वतीने आयोजित जामखेड ते पंढरपूर पायी दिंडींचे मोठ्या उत्साहात प्रस्तान
गेल्या एकतीस वर्षापासून जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा बाफना परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात येतो. आज जामखेड वरून मोठ्या उत्साहात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात श्री क्षेत्र पंढरपुरकडे प्रस्थान झाले.
तीस वर्षांपूर्वी हभप बाबा महाराज सातारकर, हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड ते पंढरपूर दिंडी सोहळा सुरू केला होता आजही हा सोहळा सुरू आहे.
यावेळी हभप बागडे महाराज, दिलीप बाफना, सिताराम महाराज, दिलीप गुगळे, हभप दिपक महाराज गायकवाड, पवन राळेभात, शरद शिंगवी, पंढरीनाथ राजगुरू महाराज, अशोक बाफना, अशोक शिंगवी, तुषार बोथरा, अभय बाफना यांच्या सह मोठ्या संख्येने वारकरी व बाफना परिवाराचे मीत्र मंडळी उपस्थित होते.
यावेळी हभप बागडे महाराज, दिलीप बाफना, अशोक शिंगवी, सिताराम महाराज, दिलीप गुगळे,
शरद शिंगवी, तुषार बोथरा यांनी शुभेच्छा दिल्या.
आज मंगळवार दि. ५ रोजी विठ्ठल मंदिरातून जामखेड शहरात बाल वारकऱ्यांसह प्रदक्षिणा घालत प्रस्तान झाले बुधवार दि. १३ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे जाणार आहे तरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी व्हावे असे आवाहन दिलीप बाफना मित्रमंडळ व विठ्ठल भजनी यांनी आवाहन केले आहे.
दिंडीमध्ये शेकडो भाविक सहभागी झाले आहेत.
दिंडीच्या अग्रभागी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करणारे झेंडेकरी, पांढर्या पोशाखात सहभागी भाविक,
भजनी मंडळी, फुलांनी सजवलेले रथ व डोक्यावर तुळशी, कळस घेतलेल्या महिला वारीसाठी निघाल्या आहेत.